करमाळामाढाराजकारण

कुर्डूवाडीच्या ९१७ मालमत्ता धारकांना न्याय माजी आमदार पाटील यांच्यामुळेच; पाटील गटाच्या प्रवक्त्यांची आ.शिंदेवर टीका, वाचा सविस्तर 

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

कुर्डूवाडीच्या ९१७ मालमत्ता धारकांना न्याय माजी आमदार पाटील यांच्यामुळेच; पाटील गटाच्या प्रवक्त्यांची आ.शिंदेवर टीका, वाचा सविस्तर 

जेऊर(प्रतिनिधी); माजी आमदार नारायण पाटील यांच्या काळातच 917 मालमत्ता धारकांना न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा झाला, विद्यमान आमदार हे आता हा प्रश्न अधिक अवघड असल्याचे भासवून प्रश्न रेंगाळत ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचा घणाघाती आरोप माजी आमदार नारायण पाटील गटाकडून प्रवक्ते सूनील तळेकर यांनी केला. सध्या कुर्डुवाडीतील 917 मालमत्ता धारकांचा प्रश्न ऐरणीवर आला असून या कामाचे श्रेय घेण्यासाठी राजकीय गट समोर येऊ लागले आहेत.आज पाटील गटाकडून या प्रश्नावर भुमिका मांडण्यात आली. 

यावेळी बोलताना तळेकर यांनी सांगितले की तत्कालीन आमदार नारायण पाटील यांनी 2014 साली विधानसभेत हा प्रश्न मांडला. यानंतर लाल फितीत व नियमांच्या जोखडातून हा प्रश्न बाहेर आला. दि 14 आॅगस्ट 2019 रोजी मा आ नारायण पाटील यांच्या व जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत या प्रकरणी एक बैठक पार पडली. 

 

त्यावेळी 917 पैकी 662 प्रकरणे दाखल होती. यातील 390 मिळकती ही ब वर्गातून अ वर्गात रुपांतरीत करणे व उर्वरित पात्र ब वर्ग 272 मिळकती ह्या नियमित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले. सन 2019 च्या रेडीरेकनरच्या 25 टक्के रक्कम तीन वर्षाच्या आत भरली गेली तर या मिळकती कायमस्वरूपी मालकी हक्काच्या होणार असल्याचे शासनाने स्पष्ट केले होते.

 परंतू 2014 नंतर करमाळा-माढा मतदारसंघात सत्तांतर झाल्यानंतर या प्रश्नास बगल देऊन जाणीवपूर्वक हा प्रश्न तसाच कायम ठेवण्याचे काम विद्यमान आमदार महोदयांनी केले. कुर्डुवाडीसह 36 गावात दादा-मामा गट निर्माण करुन विकासाचे प्रश्न जाणीवपूर्वक झुलते ठेवण्याची आ. शिंदे बंधूंची खासियत आहे. 

निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन हवे तेंव्हा या प्रश्नावर फुंकर मारुन हे प्रश्न ऐरणीवर आणले जात आहेत. कुर्डुवाडीतील 917 मालमत्ता धारकांचा प्रश्न सुद्धा गेली 24 वर्षे असाच झुलवत ठेवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. सन 2014 ते 2019 या दरम्यान माजी आमदार नारायण पाटील यांनी मनापासून हा प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला व बऱ्याच प्रमाणात हा प्रश्न सुटण्याच्या स्थितीत आला. 

आज केवळ माजी आमदार नारायण पाटील यांना या कामाचे श्रेय जाऊ नये म्हणून दिरंगाई केली जात आहे. 1995 पासून कुर्डुवाडी शहर व माढा तालूक्यावर शिंदे बंधूचे साम्राज्य असूनही हा प्रश्न आज इतके वर्ष रखडला गेला आहे. 

शहर, तालूका, राज्य व केंद्र अशी राजकीय सत्तेची साखळी असतानाही हा प्रश्न सोडविण्यासाठी 2014 पुर्वी कधीच प्रयत्न झाले नाहीत. विद्यमान आमदार यांना 2019 नंतर महाविकास आघाडीचे सरकार असतानाही हा प्रश्न तातडीने सोडवणे गरजेचे वाटले नाही. 

परंतू सत्तांतर झाल्यानंतर आता विरोधी बाकावर बसून मात्र 917 मालमत्ता धारकांचा प्रश्न सोडविण्यासाठी वरवरचे प्रयत्न आ शिंदे यांच्याकडून केले जात आहेत.खरा प्रश्न माजी आमदार नारायण पाटील यांनी त्यांच्या काळातच सोडवला आहे. जिल्हाधिकारी यांनी तसे आदेशही पारित केले आहेत.फक्त एकसुत्रता व नियमांच्या तसेच आदेशाची अंमलबजावणी करण्याची गरज आहे.

दादा-मामा पारड्यात हा प्रश्न टाकुन टांगता ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

सर्वच राजकीय पक्षां समवेत आपले चांगले संबंध असल्याचे करमाळा-माढा मतदार संघातील जनतेला सांगण्यासाठी जर गोव्याच्या मुख्यमंत्री महोदयांना माढा तालूक्यात निमंत्रण दिले जात असेल तर मग अजूनही कुर्डूवाडी रेल्वे वर्कशॉप व 917 मालमत्ता प्रकरण हे दोनच प्रश्न वर्षानुवर्षे रखडले का जात आहेत अशी विचारणा तळेकर यांनी केली. 

तर लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर कुर्डूवाडी येथील 917 मालमत्ता धारकांची बाजु माजी आमदार नारायण पाटील हे मांडणार असल्याची माहिती प्रवक्ते तळेकर यांनी दिली.

litsbros

Comment here