करमाळाजेऊरशैक्षणिक

जेऊर येथील भारत महाविद्यालयातील प्रशासकीय कर्मचारी आजपासून ‘या’ विविध मागण्यांसाठी संपावर 

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

जेऊर येथील भारत महाविद्यालयातील प्रशासकीय कर्मचारी आजपासून ‘या’ विविध मागण्यांसाठी संपावर 

करमाळा(प्रतिनिधी); महाराष्ट्र राज्य शासनाकडे प्रलंबित असलेल्या सहा मागण्यासाठी विद्यापीठ व महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संपावर गेलेले असून जेऊरच्या भारत महाविद्यालयातील प्रशासकीय कर्मचारी या संपात सहभागी झालेले आहेत. आजपासून बेमुदत संप सुरू असून यामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य अधांतरी झालेले आहे. खालील मागण्यासाठी कर्मचारी संपवर गेले आहेत त्या मागण्या खालील प्रमाणे

1) सेवाअंतर्गत सुधारित आश्वासित प्रगती योजनेचा रद्द केलेले शासन निर्णय पुनर्जिवित करुन पूर्ववत लागू करा.

2) सातव्या वेतन आयोगातील तरतुदीनुसार 10/20/30 वर्षानंतरच्या लाभाची योजना विद्यापीठीय व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू करा.

3) सातव्या वेतन आयोगापासून वंचित असलेल्या 1410 विद्यापीठीय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करुन विद्यापीठीय व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2016 ते प्रत्यक्ष सातवा वेतन लागू झाला त्या कालवधीतील वेतनाच्या फरकाची थकबाकी अदा करा.

4) विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त असलेली पदे भरण्यास मान्यता द्या.

5) 2005 नंतर सेवेत रुजु झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू करा.

6) विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाची वेतनश्रेणी गृहित धरून त्या आधारे सातवा वेतन आयोगाची वेतनश्रेणी लागू करा.

वरीलप्रमाणे मागण्यांसाठी भारत महाविद्यालयातील प्रशासकीय कर्मचारी संपावर आहेत.

litsbros

Comment here