करमाळासोलापूर जिल्हा

करमाळयात विविध सामाजिक संघटनांच्या वतीने सुनील सावंत व शिवराज जगताप यांचा सत्कार

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळयात विविध सामाजिक संघटनांच्या वतीने सुनील सावंत व शिवराज जगताप यांचा सत्कार

करमाळा(प्रतिनिधी); बहुजन विकास संस्था, बहुजन विकास बचत गट आणि भारत मुक्ती मोर्चा यांच्या वतीने करमाळा विविध कार्यकारी सोसायटी निवडणूकीत बिनविरोधी निवडून आलेले सुनील सावंत आणि शिवराज जगताप यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी शुभेच्छापर बहुजन विकास संस्थेचे अध्यक्ष इसाक पठाण, भारत मुक्ती मोर्चाचे संयोजक आर आर पाटील, दलित सेना जिल्हाध्यक्ष लक्ष्मण भोसले यांनी आपले विचार मांडले.

यावेळी सत्काराला उत्तर देत सत्कारमूर्ती सुनील सावंत आणि शिवराज जगताप यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी एड. नईम काझी, गुलाम सय्यद, जमीर पठाण, आफताब मुलाणी, इलाही आतार, मन्ना माणेरी, दीपक भोसले, दिनेश माने, गौतम खरात, दिनेश दळवी आदी मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा – माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या तक्रारीनंतर करमाळा येथील शिंदे यांच्या साखर कारखान्याला प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून समजपत्र; वाचा सविस्तर

करमाळा तालुक्यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा जलवा कायम; महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर नव्या शाखेचे उद्घाटन

यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बहुजन विकास बचत गटाचे अध्यक्ष जमीर मुलाणी यांनी केले तर आभार भारत मुक्ती मोर्चाचे कार्याध्यक्ष कयुम शेख यांनी मानले.

litsbros

Comment here