करमाळा

उजनी प्रकल्पामुळे पुनर्वसित झालेल्या करमाळा तालुक्यातील ‘या’ ३० गावांच्या समस्याबाबत बैठकीचे आयोजन; आ.संजयमामा शिंदे यांची माहिती

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

उजनी प्रकल्पामुळे पुनर्वसित झालेल्या करमाळा तालुक्यातील ‘या’ ३० गावांच्या समस्या बाबत बैठकीचे आयोजन; आ. संजय मामा शिंदे यांची माहिती

 करमाळा(प्रतिनिधी)

         उजनी धरणाच्या बांधकामानंतर करमाळा तालुक्यातील 30 गावे पुनर्वसित झालेली आहेत. या गावांसाठी महाराष्ट्र शासनाच्या पुनर्वसन विभागाकडून 18 नागरी सुविधांचे लाभ मिळणे आवश्यक होते. त्यापैकी अनेक गावांमध्ये अद्यापही हे लाभ मिळालेले नाहीत.

या गावांच्या समस्यांबाबत शुक्रवार दिनांक 20 ऑक्टोबर 2023 रोजी सायंकाळी 4 वाजता पंचायत समिती सभागृह करमाळा येथे जिल्हा पुनर्वसन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विशेष बैठक बोलावली असल्याची माहिती करमाळा मतदारसंघाचे आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली.

           

याविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले की, जानेवारी 2023 मध्ये आपण करमाळा तालुक्यांमध्ये गावभेट दौरा आयोजित केलेला होता. या गाव भेट दौऱ्यात प्रत्येक गावातून आलेल्या समस्यांची नोंदणी केली गेली होती.

 विशेषतः उजनी धरणाच्या बांधकामानंतर करमाळा तालुक्यातील पुनर्वसीत गावांच्या अनेक समस्या लोकांनी मांडल्या.या समस्या सोडवण्यासाठी पुनर्वसन विभागाकडे आपण जून 2023 मध्ये पत्रव्यवहार केला होता. 

त्यानुसार सदर बैठक बोलावली असून या बैठकीसाठी वांगी नं.1,वांगी नंबर 2, वांगी न. 3, वांगी नं.4, भिवरवाडी ,दहिगाव, बिटरगाव, कुगाव, चिखलठाण नं.1, चिखलठाण न. 2, ढोकरी, पारेवाडी, केतुर नं.1, केतुर नंबर 2, पूर्व सोगाव, पश्चिम सोगाव,उंदरगाव, गोरेगाव, रिटेवाडी, कविटगाव, सांगवी क्र.1, सांगवी क्र.2, कंदर, पोमलवाडी ,खातगाव नं.1, खातगाव नं.2, कात्रज, नेमतवाडी, टाकळी, कोंढार चिंचोली आदी गावातील नागरिकांनी त्यांच्या समस्यांसह बैठकीसाठी उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे.

litsbros

About the author

karmalamadhanews24

Add Comment

Click here to post a comment

Mgid Advertisement

Ad 400×432

Similar News

Advertisment Area 1

Advertisment Area 2

Facebook Page

error: Content is protected !!