करमाळाराजकारण

करमाळा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी माजी आमदार नारायण आबा पाटील गटाकडून 51 जणांचे अर्ज दाखल; क्लिक करून वाचा नावांसह सविस्तर

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी माजी आमदार नारायण आबा पाटील गटाकडून 51 जणांचे अर्ज दाखल; क्लिक करून वाचा नावांसह सविस्तर

करमाळा (प्रतिनिधी अलीम शेख)

करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी पाटील गटाकडून 51 उमेदवारानी नामांकन अर्ज दाखल केल्याची माहिती पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती देताना तळेकर यांनी सांगितले की माजी आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वावर करमाळा तालुक्यातील जनतेचा विश्वास टिकून राहिला असून तालुका अंतर्गत निवडणुकांमध्ये जनतेने पाटील गटास भरभरून आशीर्वाद दिले आहेत. यामुळे बाजार समितीच्या या निवडणूकीत पाटील गटाचा विजय निश्चित आहे.

पाटील गटाची स्पर्धा विद्यमान आमदार संजयमामा शिंदे यांचेशी असून इतर गटा बरोबर टोकाचे मतभेद नाहीत. आमदार संजय मामा शिंदे यांच्या निष्क्रियतेमुळे गेली चार वर्ष झाली करमाळा तालुक्यातील विकास कामे ठप्प असून बाजार समितीच्या निवडणूकीत जनता याबद्दल निश्चितच मतपेटीतून आपली प्रतिक्रिया व्यक्त करणार.

पाटील गटाकडून या निवडणुकीसाठीच्या बाबतीत निर्णय घेण्याचे सर्व अधिकार माजी आमदार नारायण पाटील यांना असून त्यांच्या आदेशानुसार या निवडणुकीतील विजयासाठी पाटील गटाचे कार्यकर्ते तयार असल्याचेही सांगत विजया बद्दलची खात्री तळेकर यांनी बोलून दाखवली.

या निवडणुकीत पाटील गटाकडून आदिनाथ कारखान्याचे माजी संचालक नवनाथ झोळ, पाटील गटाचे युवानेते पृथ्वीराज पाटील, केमचे सरपंच अजितदादा तळेकर, युवानेते पृथ्वीराज राजेभोसले, बाजार समिती माजी संचालक देवानंद बागल, माजी सभापती बापूसाहेब पाटील, नंदाताई हरिदास केवारे,सरपंच डॉ.अमोल घाडगे,

जोतिराम नारुटे, दत्तात्रय गव्हाणे, सचिन राऊत, विजयसिंह नवले, बहुजन सेनेचे नेते राजाभाऊ कदम, बाळु पवार , संदीप मारकड, सरपंच राम हरी कुदळे, नितीन हिवरे, रामेश्वर तळेकर, हनुमंत आवटे, किरण पाटील, ग्रा प सदस्य संजय तोरमल,

विलास कोकने, महेश पाटील, राहुल गोडगे, विशाल केवारे,अशोक शेळके, वैभव पाटील, छगन शिंदे, बापू लोखंडे, युवराज मेरगल, शिवाजी सरडे, रियाज मुल्ला, धनु शिरस्कर, आनंद अभंग, जयराम सोरटे, रावसाहेब शिंदे,अप्पा चौगुले, मनीशाताई कांबळे यासह अनेक पदाधिकारी या निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

litsbros

Comment here