करमाळा

प्रेरणा मानव विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामदास कांबळे यांना “समाजभूषण पुरस्कार”

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

प्रेरणा मानव विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामदास कांबळे यांना “समाजभूषण पुरस्कार”

करमाळा (प्रतिनिधी) – प्रेरणा मानव विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामदास कांबळे यांना सातारा येथे “समाजभूषण” पुरस्कार देऊन गौरवण्यात आले सातारा येथे झालेल्या मातंग परिषदेमध्ये आमदार जयदेव गायकवाड व आमदार राजीव आवळे यांच्या हस्ते कांबळे यांना शाल श्रीफळ व ट्रॉफी देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी आमदार जयदेव गायकवाड बोलताना म्हणाले कि , कांबळे यांचे कार्य खूप उल्लेखनीय आहे, ते प्रेरणा मानव विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवत आहेत ते सदैव समाज हिताचे कार्य करत आहेत.

 यावेळी आमदार राजीव आवळे बोलताना म्हणाले की , श्री कांबळे यांचे कार्य गौरवशाली आहे ते प्रेरणा मानव विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून नेत्रदान शिबिर वृक्षारोपण अन्नदान अशा विविध माध्यमातून ते आपले कार्य पुढे नेत आहेत त्यांच्या कार्यास आमचा सदैव पाठिंबा राहील असे बोलताना आवळे म्हणाले.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे उपाध्यक्ष पंडित कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेस सातारा जिल्हा सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष रमेश उबाळे, उत्तम कांबळे धनंजय साठे लक्ष्मण कांबळे अजित पात्रे शैलेंद्र जाधव विकी लोखंडे गणेश सोनवणे सम्राट गोंधळी कुमार लोंढे अभिजीत ससाणे या सह सातारा जिल्ह्यातील विविध मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

litsbros

Comment here