उमरड येथे श्रावी फिटनेस क्लबचे तानाजीभाऊ जाधव यांच्या हस्ते उदघाटन
उमरड (नंदकिशोर वलटे)
दि.२२.उमरड येथे श्रावी फिटनेस क्लब या जिमचे उदघाटन टायगर ग्रूपचे अध्यक्ष श्री तानाजी भाऊ जाधव आणि बॉडी बिल्डर विशाल जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी उमरड गावचे नेते श्री.वामनराव बदे, श्री.श्रीमान चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी बोलताना मान्यवरांनी तरुणांना व्यायामा संधार्बत त्याचे फायदे समजाऊन सांगितले.
करमाळा येथील बाबा पॉवरहाऊस चे मालक आणि बॉडी बिल्डर विशाल जाधव यांनी फिटनेस संधर्भात मार्गदर्शन करून तरुणांना मशीन वरती वेगवेगळे सेट मारून दाखवले.
उमरड मधील गायकवाड परिवाराने उमरड गाव आणि आसपासच्या गावातील तरुणांची व्यायामाच्या संधरबातील गैरसोय ओळखून गावात सुसज्ज अशी जिम स्थापन केली आहे.
अगोदर या भागातील तरुणांना जिम साठी जेऊर किंवा वीट या ठिकाणी जावे लागत होते परंतु आता जवळ सोय झाल्यामुळे तरुण वर्गात आनंदाचे वातावरण आहे.
Comment here