करमाळा एसटी स्टँड च्या दुरुस्तीसाठीचा निधी महेश चिवटे यांच्या प्रयत्नामुळे मंजूर झाल्याचा दावा; मा.आ.नारायण पाटील गटावर टीका, श्रेयवाद पेटला!
करमाळा (प्रतिनिधी); करमाळा एसटी स्टँड खड्डे मुक्त करण्यासाठी दोन कोटी रुपये निधी द्यावा चालवा व हस्तांतरित करा या योजनेअंतर्गत करमाळा एसटी स्टँड साठी निधी द्यावा व जेऊर एसटी स्टँड साठी दोन दोन कोटी रुपये निधी द्यावा आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती.
यावेळी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वात समक्ष एस टी महामंडळाचे मुख्य प्रशासकीय अधिकारी चेन्नी साहेबांना चिवटे यांच्या सूचनाप्रमाणे काम करण्याचे आदेश दिले होते.
पंढरपूरच्या आषाढी वारीच्या यात्रेदरम्यान एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांची नियोजन बैठक वर्षा बंगल्यावर झाली होती, या बैठकीत महेश चिवटे यांनी हा विषय मांडला होता.
याबाबत एक महिन्यापूर्वी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अनिल पाटील यांनी सोलापूर येथे जाऊन संबंधित अधिकाऱ्यांची चर्चा करून सर्व माहिती दिली.
यानंतर एसटी महामंडळाचे बांधकाम विभागाचे अधिकारी करमाळा येथे येऊन एसटी महामंडळाच्या परिसराची पाहणी करून
खड्डे मुक्त करण्याचे प्रस्ताव तयार करण्याची आदेश दिले.
या कामाच्या आदेशाचा महाविकास आघाडीच्या शासनाच्या कोणताही निर्णय झालेला नव्हता
या संबंधातील सर्व पत्र व्यवहार महेश चिवटे यांच्या कार्यालयात उपलब्ध आहे
नेत्याचे अपयश झाकन्याच प्रयत्न –
” श्रेय घेण्याचा कुणीही केविलवाना प्रयत्न करू नये असा मार्मिक टोला नागेश गुरव यांनी लगावला आहे.
स्वयंघोषित पगारी प्रवक्ते अशा बनावट व काल्पनिक बातमी देऊन स्वतःच्या नेत्याची अपयश झाकत असल्याची खरमरीत टीका गुरव यांनी माजी आमदार नारायण आबा पाटील यांच्या गटावर व प्रवक्त्यावर केली आहे.
Comment here