करमाळाराजकारण

दहा कोटीहून अधिक निधीच्या करमाळा तालुक्यातील ‘या’ रस्त्यांच्या कामावरील स्थगिती उठली; आ.संजयमामा शिंदे यांची माहिती

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

दहा कोटीहून अधिक निधीच्या करमाळा तालुक्यातील ‘या’ रस्त्यांच्या कामावरील स्थगिती उठली; आ.संजयमामा शिंदे यांची माहिती


करमाळा (प्रतिनिधी);
करमाळा तालुक्यातील 4 प्रमुख जिल्हा मार्ग मजबुती करण्यासाठी 10 कोटी 92 लाख निधीची तरतूद मार्च 2022 च्या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली होती.

परंतु सरकार बदलानंतर सदर कामावर 23 जुलै 2022 रोजी स्थगिती देण्यात आली होती सदर कामावरील स्थगिती आज 31 जुलै 2023 रोजी शासन अध्यादेशानुसार उठली असल्याची माहिती आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली.

याविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळामध्ये रस्ते विकासासाठी मार्च 2022 च्या अर्थसंकल्पात 32 कोटी निधीची तरतूद करण्यात आलेली होती .

त्यातील मंजूर कामांपैकी 4 कामावरती फडणवीस – शिंदे सरकारने स्थगिती दिलेली होती .सदर स्थगिती आजच्या शासन अध्यादेशानुसार उठली असून प्रमुख जिल्हा मार्गांच्या मजबुतीकरणाचे काम यामुळे पूर्ण होणार आहे.

या रस्ते कामावरील स्थगिती उठली –

1. बोरगाव करंजे मिरगव्हाण निमगाव गौंडरे नेरले ते वरकुटे निंभोरे लव्हे जेऊर रस्ता प्रजिमा क्र.6 – 2 कोटी 85 लाख.

2. मिरगव्हाण अर्जुननगर शेलगाव क सौंदे वरकटणे कोंढेज रस्ता प्रजिमा क्रमांक 8 – 1 कोटी 90 लाख.
3. कोर्टी दिवेगव्हाण पारेवाडी रेल्वे स्टेशन ते केतुर 2 ते पोमलवाडी रस्ता प्रजिमा -124 – 2 कोटी 85 लाख.

4. पारेवाडी राजुरी अंजनडोह झरे कुंभेज निंभोरे मलवडी दहिवली कन्हेरगाव ते वेणेगाव प्रजिमा 4 –
3 कोटी 32 लाख.

अशी एकूण 10 कोटी 92 लाख निधी मंजूर असलेल्या कामावरील स्थगिती उठलेली असून या रस्त्यांच्या मजबुतीकरणाचे काम लवकरच पूर्ण होईल. महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळामध्ये मंजुरी मिळालेल्या या रस्त्यावरील स्थगिती उठविण्यासाठी आपण उच्च न्यायालयामध्ये याचीकाही दाखल केलेली होती.

त्याचप्रमाणे विद्यमान सरकारमध्ये ni उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांची एन्ट्री झाल्यामुळे सदर स्थगिती उठण्यास मदत झाल्याची माहिती आ.शिंदे यांनी दिली.

litsbros

Comment here