करमाळा येथील झंकार बॅण्डच्या गोडावूनला आग लागून तीन लाख रूपयांचे नुकसान
करमाळा: प्रतिनिधी अलीम शेख
करमाळा शहरातील साठे नगर भागात झंकार बँड पथकाचे दुकानाच्या गोडाऊनला भर दुपारी अचानक लागलेल्या आगीने सुमारे तीन लाख रुपयाचे नुकसान झाले आहे.
याची खबर झंकार बँड चे मालक नजीर कासम पठाण यांनी तहसीलमध्ये दिली आहे.
हा प्रकार गुरूवारी दुपारच्या सुमारास घडला आहे .
आग लागल्याची माहिती मिळताच ती विझवण्यासाठी तेथील रहिवाशांनी प्रयत्न केला मात्र आगीने रौद्र रूप धारण केल्याने बॅण्ड चे सर्व साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.
याआगी मध्ये ढोल, ताशे, मोठे साऊंड, जनरेटर, आदि बॅड पथकातील आवश्यक असणारे मौल्यवान साहित्य जळून खाक झाले आहे. याचा पंचनामा करमाळा तलाठी विनोद भागवत जवणे यांनी केला आहे.
यावेळी तोफिक ईसाक पठाण, सुरेश महादेव रांजणकर तसेच नजीर कासम पठाण, जाकीर पठाण, ईसाक कासम पठाण, जावेद पठाण, आदि लोक उपस्थित होते.
Comment here