करमाळाशैक्षणिक

टॅलेंट हंट तालुकास्तरीय स्पर्धेत जिल्हा परिषद पोथरे शाळेचा दबदबा

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

टॅलेंट हंट तालुकास्तरीय स्पर्धेत जिल्हा परिषद पोथरे शाळेचा दबदबा

 करमाळा (प्रतिनिधी); 

दि.६ व ७ डिसेंबर रोजी झालेल्या तालुकास्तरीय टॅलेंट हंट स्पर्धेमधे पोथरे जिल्हा परिषद शाळेने गतवर्षीप्रमाणे आपला दबदबा कायम ठेवला आहे. जवळजवळ सर्वच स्पर्धा प्रकारात विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केलेले असून आपल्या यशाची उज्वल परंपरा कायम ठेवली आहे.

यामधे सोनाली ज्ञानदेव पुराणे( मोठा गट कथाकथन स्पर्धा ) प्रथम क्रमांक, सृष्टी रणजीत शिंदे (लहान गट निबंध स्पर्धा ) व्दितीय क्रमांक, मीरा विठ्ठल शिरगिरे ( मोठा गट वक्तृत्व स्पर्धा तृतीय क्रमांक ), समुहनृत्य (लहान गट व्दितीय क्रमांक ), समुहनृत्य (मोठा गट व्दितीय क्रमांक ), समुहगीत गायन स्पर्धा (मोठा गट व्दितीय क्रमांक )असे क्रमांक मिळवले आहेत.

या सर्व विद्यार्थ्यांना श्रीम. शगुफ्ता हुंडेकरी, श्रीम, सविता शिरसकर व श्री. दत्तात्रय मस्तुद या शिक्षकांनी विशेष मार्गदर्शन केले. याकामी श्रीम. शाबिरा मिर्झा, श्रीम. स्वाती गानबोटे, श्री. बापू रोकडे या शिक्षकांचे सहकार्य लाभले.

यशस्वी गुणवंत स्पर्धक विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक आणि कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक श्री. गजेंद्र गुरव या सर्वांचे पोथरे गावचे सरपंच श्री. धनंजयकाका झिंजाडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. संतोष साळुंके, उपाध्यक्षा सौ. विद्या शिंदे, सर्व सदस्य आणि तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री. राजकुमार पाटील साहेब, विस्तार अधिकारी श्री . सुग्रीव नीळ साहेब , श्री. जयवंत नलवडे साहेब , केंद्रप्रमुख श्री . निशांत खारगे सर आणि पोथरे केंद्रातील सर्व शिक्षक , पोथरे गावातील सर्व ग्रामस्थ यांनी विशेष अभिनंदन करून पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

litsbros

Comment here