करमाळाजेऊरराजकारण

जेऊर ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी पाटील गटाचे नागेश झांजुर्णे यांची बिनविरोध निवड

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

जेऊर ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी पाटील गटाचे नागेश झांजुर्णे यांची बिनविरोध निवड

करमाळा प्रतिनिधी

करमाळा तालुक्यातील जेऊर येथील ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी माजी आमदार नारायण आबा पाटील गटाचे समर्थक तसेच जेऊर येथील श्री स्वामी विवेकानंद ग्रामीण सह पतसंस्थेचे चेअरमन नागेश झांजुर्णे यांची आज उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाली. यावेळी नवनिर्वाचित नूतन सरपंच पैलवान पृथ्वीराज पाटील सहित सर्व सदस्य उपस्थित होते.

माजी आमदार नारायण आबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या जेऊर येथील ग्रामपंचायतच्या नूतन उपसरपंच पदासाठी झांजुर्णे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस एस रणदिवे तसेच ग्रामविकास अधिकारी अंगद माने यांनी काम पाहिले. सदरची निवड जेऊर येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये शांततेच्या वातावरणात करण्यात आली. यावेळी जेऊर येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश टिळेकर यांनी सदरची निवडणूक शांततेच्या वातावरणात पार पाडण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. नुकत्याच संपन्न झालेल्या जेऊर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये माजी आमदार नारायण आबा पाटील यांच्या गटाने विरोधकाचा दारुण पराभव करीत पंधरापैकी पंधरा जागा जिंकून ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सत्ता स्थापन केली आहे.

माजी आमदार नारायण आबा पाटील यांच्या जेऊर येथील ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी तरुण पिढीला स्थान दिल्याने तरुण वर्गात नव चैतन्याचे वातावरण पसरले आहे.

जेऊर येथील उपसरपंच पदी नागेश झांजुर्णे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा माजी आमदार नारायण आबा पाटील पाटील यांनी विशेष सत्कार केला.

litsbros

Comment here