करमाळा

करमाळा तालुक्याला अधिकृत तहसीलदार मिळावे म्हणून सोमवारी बोंबाबोंब आंदोलन; वाचा सविस्तर

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा तालुक्याला अधिकृत तहसीलदार मिळावे म्हणून सोमवारी बोंबाबोंब आंदोलन; वाचा सविस्तर


करमाळा (प्रतिनिधी); करमाळा तालुक्याला सात महिन्यापासून अधिकृत तहसीलदार नाही, प्रभारी तहसीलदार वरच तहसील कार्यालयाचा कारभार चालतो
दिनांक 14 /4 /2023 ला तहसीलदार समीर माने यांची करमाळ्यातून बदली झाली तेव्हापासून करमाळ्याचे तहसीलदार पद रिक्त आहे.


रस्ता केस जमिनीच्या तक्रारी सात महिन्यापासून प्रलंबित आहेत. निकाल लागत नसल्याने शेतकरी वर्ग चिंताग्रस्त आहे. विविध कामाच्या अनेक फाइली पडून असल्याने करमाळा तालुक्यातील जनता त्रासून गेली आहे.

मात्र करमाळा तालुक्याचे विद्यमान आमदार खासदार पालकमंत्री तालुक्याला तहसीलदार आणण्यास अपयशी ठरले आहेत, म्हणून बहुजन संघर्ष सेना तहसील कार्यालयासमोर दिनांक 20 /11 /2023 रोजी दुपारी बारा वाजता बहुजन संघर्षनेचे संस्थापक अध्यक्ष राजाभाऊ कदम यांच्या नेतृत्वाखाली करमाळा तालुक्याला तहसीलदार मिळाला पाहिजे म्हणून बोंबाबोंब आंदोलन करणार आहे. आमदार खासदार पालकमंत्री महाराष्ट्र सरकारच्या नावाने बहुजन संघर्ष सेना बोंबाबोंब आंदोलन करणार आहे. तेव्हा तालुक्यातील सर्व नागरिकांनी या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन राजाभाऊ कदम यांनी केले आहे.

litsbros

Comment here