करमाळा

करमाळा तालुक्यात ढगाळ वातावरण; पावसाची शक्यता

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा तालुक्यात ढगाळ वातावरण; पावसाची शक्यता

केत्तूर (अभय माने): गेल्या आठवड्यापासून करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागात पुन्हा एकदा वातावरणात बदल झाला असून सायंकाळी ढगाळ वातावरण तयार होत असल्याने थंडी गायब झाल्याचे चित्र आहे.पावसाची शक्‍यताही वाढली आहे.

     सकाळी ढगाळ वातावरण दिवसभर ऊन आणि थंडगार वारे पुन्हा एकदा ढगाळ वातावरण तयार होत आहे.गेल्या काही दिवसात थंडी वाढू लागली होती मात्र ढगाळ वातावरणामुळे थंडी पुन्हा एकदा गायब झाली आहे.

    पावसाळ्यात कमी प्रमाणात पाऊस झाल्याने रब्बी हंगाम शंकरात आला आहे तर उन्हाळ्याची उन्हाळ्यात पाणीटंचाई मोठे संकट जाणवणार आहे.

गुरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर होणार आहे. भूगर्भातील पाणीपातळी खोलवर जाऊ लागली आहे.आता जर पाऊस झाला तर पेंरणी झालेल्या ज्वारी पिकासाठी वरदान ठरणार आहे.

litsbros

Comment here