आदिनाथ यावर्षी सक्षमपणे उसाचे गाळप करणार; प्रशासकीय संचालक बेंद्रे यांचा विश्वास
करमाळा (प्रतिनिधी); आदिनाथ सहकारी साखर कारखाना वर्षीचा गळीत हंगाम सक्षमपणे वेळेत सुरू करणार असून पाच लाख टन उसाचे गाळप उद्दिष्ट ठेवले असून सर्व ऊस उत्पादक सभासदांच्या विश्वासावर हा गळीत हंगाम यशस्वी होईल असा विश्वास प्रशासकीय संचालक बाळासाहेब बेद्रे यांनी व्यक्त केला
आज आदिनाथ कारखान्यावर आढावा बैठक झाली या बैठकीसाठी प्रशासकीय संचालक महेश चिवटे संजय गुटाळ कारखान्याचे एचडी मधुकर कदम
साखर कारखान्याचे जनरल मॅनेजर श्री सुरेश लक्ष्मण पाटील
चीफ केमिस्ट पोपट तुकाराम शिरसागर उपस्थित होते.
यावेळी कारखान्याच्या प्रमुख अधिकाऱ्यांची नेमणूक निश्चित करण्यात आली.
यावेळी बोलताना प्रशासकीय संचालक
बेंद्रे म्हणाले की प्राप्त परिस्थितीत सर्व अडचणीवर मात करत यावर्षीचा गळीत हंगाम यशस्वीपणे पार पाडणार आहोत.
कामगारांच्या वेळेत पगारी व उत्पादकांना वेळेवर पैसे देणे याची नियोजन केले आहे.
ऊस तोडणी कार्यक्रम निश्चित करण्याचे काम सुरू असून यासाठी आरोग्य मंत्री प्राध्यापक तानाजीराव सावंत व संपर्कप्रमुख शिवाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली वाहन कराराची नियोजन करण्यात येणार आहे
– महेश चिवटे
प्रशासकीय संचालक आदिनाथ कारखाना
आज कारखान्यावर आढावा बैठक घेतली असता गेल्या वर्षीच्या हंगामात गरज नसताना 97 लाख रुपयांच्या पाईप खरेदी करण्याची निदर्शनास आले आहे
पाईप तसेच पडून आहेत.
शिवाय गरज नसताना मॉलिशियस वाहतूक करणारी नळी बदलण्यात आली आहे स्टोअर मध्ये जवळपास चार कोटी रुपयांचा माल शिल्लक आहे
डिझेल पंपाचे पैसे इतरत्र वापरल्यामुळे आदिनाथ कारखान्याला या पंपापासून दर महिना तीन लाख रुपये मिळणारे कमिशन बंद झाले आहे
या सर्व मागील संचालक मंडळाच्या चुका दुरुस्त करण्याचे काम सुरू आहे
– संजय गुटाळ
प्रशासकीय संचालक
आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत व प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांच्या विश्वासाला पात्र राहून आम्ही पारदर्शक कारभार करणार असून कारखान्याच्या नुकसान करणाऱ्या व्यक्तींना पदाधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना कारखान्यात थारा दिली जाणार नाही
भ्रष्टाचार मुक्त कारखाना चालवणे आमचे उद्दिष्ट आहे
कारखान्याचा संपूर्ण आढावा मांडून कारखान्यातील वस्तुस्थिती सभासदांपुढे मांडू असा विश्वास व्यक्त केला.
Comment here