करमाळा तालुक्यात ऑक्टोबर हिट सोबत इलेक्शन हिट; ग्रामपंचायत निवडणुकांनी राजकीय वातावरण तापले
केत्तर(अभय माने): करमाळा तालुक्यातील 16 ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे अगोदरच ” ऑक्टोबर हिट “ने वातावरण तापले असतानाच आता राजकीय वातावरणही तापू लागले आहे.
स्थानिक नेते आपल्या अस्तित्वासाठी व बेरजेचे राजकारण करत उमेदवार शोधत आहेत त्यासाठी गावकी- भावकी व जातीला विशेष महत्त्व दिले जात आहे.
करमाळा तालुक्यातील जेऊर,केम,के तूर, वीट,कंदर, उदरगाव, गौडरे,कोर्टी,राजुरी, कावळवाडी, गुलमोहरवाडी-भगतवाडी आदिसह 16 ग्रामपंचायतींचा बिगुल वाजला आहे.
सुरुवातीला सोशल मीडियावर आपल्या गावची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी आवाहन केले जात होते त्यासाठी बबैठकाही घेनल्या जात होत्या.परंतु यासाठी आपलाच उमेदवार कसा बिनविरोध होईल हेच पहिले जात होते.
त्यामुळे हा बिनविरोधचा फार्सच ठरणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी एका जागेसाठी तीन तीन अर्ज आल्याने बिंनविरोधची शक्यता सध्यातरी मावळली आहे.
Comment here