करमाळ्यात खा.रणजिसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते भारत डाळचे वाटप
करमाळा(प्रतिनिधी); केंद्र सरकारच्या नाफेड मार्फत भारत डाळ अंतर्गत करमाळा येथे माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते व भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजकुमार पाटील व जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार यांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस तथा सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गणेश चिवटे यांनी केले होते. यावेळी प्रथमतः भाजपा कार्यालयात लोकांना प्रति आधार कार्ड वर ५ की हरभरा डाळ फक्त ६० रु. दराने देण्यात आली. यामुळे प्रतिकिलोमागे लोकांचे ४० रु वाचले आहेत.यामुळे तालुक्यातील लोकांचे लाखो रु ऐन सनासूदीच्या तोंडावर वाचणार आहे व त्यांना दिलासा मिळणार आहे.
या भारत डाळ वाटप कार्यक्रमानंतर खासदार यांनी जुना डाक बंगला येथील विश्रामगृहावर सर्वसामान्य लोक, विविध गावचे पदाधिकारी,सरपंच, ग्रामपंचायत सदस्य,वि.का. से.सोसायटीचे चेअरमन सदस्य,वकील,डॉक्टर,अनेक प्रतिष्ठित व्यक्ती,भाजपा पदाधिकारी व कार्यकरर्ते यांना तब्बल ४ तास वेळ देऊन अनेक कामे जागच्या जागी मार्गी लावली.
यावेळी करमाळा माढा विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य लोकांनी रस्ते,शेतीसाठी पाणी,रेल्वे,वीज,सभामंडप आदी कामाची मागणी खासदार यांना केली.याचबरोबर पांडे, झरे, देवळाली येथील शेतकऱ्यांनी दहिगाव उपसा सिंचन योजनेचा लाभ देण्याची विनंती केली.
तसेच किरण बागल,हरिभाऊ झिंजाडे, विठ्ठल शिंदे, संदीप काळे, विष्णू रंदवे, राहुल बागल आदींनी मांगी तलाव कुकडीत वर्ग करण्याच काम लवकर मार्गी लावणायची मागणी केली. यावर खासदार साहेबांनी वरील सर्व प्रश्न मार्गी लागण्यासाठी सबंधित अधिकाऱ्यांना फोन लावून योग्य त्या सूचना दिल्या.
याशिवाय जातेगांव टेम्भूर्णी रस्त्यासाठी पाठपुरावा, जमीन अधिगृहन प्रक्रिया चालू असलेचे त्यांनी सांगितले.
यावेळी लोकसह्याद्री समूहाचे अमरसिंह शेंडे यासह अनेक पत्रकार तसेच भगवानगिरी गोसावी, बाळासाहेब कुंभार, काकासाहेब सरडे, रामभाऊ ढाणे ,अफसर जाधव, उमेश पाटील ,शहाजी बापू पाटील, श्याम सिंधी, जितेश कटारिया ,विनोद महानवर ,लक्ष्मण केकान, मोहन शिंदे, डॉ.अभिजीत मुरूमकर, अमोल पवार, नितीन झिंजाडे ,हरिभाऊ झिंजाडे ,विठ्ठल शिंदे, विष्णू रणदवे, संदिपान कानगुडे, धनंजय ताकमोगे ,अमोल जरांडे ,आण्णा देवकर, बापू तनपुरे , दादा देवकर, धर्मराज नाळे ,सोमनाथ घाडगे, महेंद्र एकाड, आजिनाथ सुरवसे आदी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व करमाळा तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comment here