आनंदवार्ता; करमाळा तालुक्यातील ‘या’ परिसरात पावसाला सुरुवात
केत्तूर ( अभय माने) केत्तूर ( ता.करमाळा ) परिसरात शनिवार (ता.24) रोजी सायंकाळी 3 वाजता रिमझिम पावसाच्या सरी कोसळल्या. पावसामुळे काही वेळ वातावरणात गारवा निर्माण झाला होता. यामुळे असह्य उकाड्याने त्रस्त झालेल्यांना रिमझिम पाऊस झाल्याने मोठा आधार व दिलासा मिळाला.
गेले काही दिवसापासून असह्य उकाड्याने नागरिक त्रस्त झाले होते. दरवर्षी जून महिन्यातील 7 जूनला पावसास सुरवात होते.मात्र यावर्षी 7 जून नव्हे तर आज 24 जून आला तरी पावसाचा लवलेश नव्हता.या 15 दिवसात तर केवळ वादळी वारेच वाहत होते.त्यामुळे ढग जमा होऊन पावसाळी वातावरण तयार होण्यास विलंब झाला.
पाऊस लांबण्यास बिपरजॉय वादळाचाही परीणाम झाला मात्र आज दिवसभर वातावरणातील वादळी वारे कमी झाले होऊन उकाडा जाणवत होता.मात्र सायंकाळी 3 वाजलेपासून केत्तूर परिसरात हलक्या रिमझीम पावसाच्या सरी कोसळण्यास सुरवात झाली.
ब्रेक के बाद चाललेल्या पावसामुळे जमिनीतील मातीला चांगलाच सुगंध आला होता.काही वेळ वातावरणात गारवा निर्माण झाल्याने येथिल नागरिकांनी समाधान व्यक्त केले.दरम्यान आता पावसाने सुरवात केली असून यापुढे एकसारखा चांगला मोठा पाऊस पडण्याची आवश्यकता आसल्याचे मत येथील शेतकऱ्यांनी बोलताना व्यक्त केले.
पाऊस लांबल्याने पिकांच्या वाढीवर परिणाम झाला होता त्यामुळे शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत होते रिमझिम का होईना पावसाने सुरवात केल्याने शेतकऱ्यांतून आनंदाचे वातावरण तयार झाले आहे.
जमिनीतील पाण्याची पातळी खोलवर गेली आहे उजनी धरणाच्या पाणी पातळीनेही तळाकडे वाटचाल सुरू केली आहे.
त्यामुळे त्यामुळे ऊस पिकासह फळबागानीही कोमेजून चालल्या होत्या. जूनच्या शेवटच्या आठवड्यात का होईना पावसाने रिमझिम का होईना हजेरी लावल्याने पावसासाला सुरवात झाली आहे.
Comment here