करमाळासोलापूर जिल्हा

करमाळा एस टी आगारासाठी तातडीने ३० नवीन बस द्या; माजी आमदार जयवंतराव जगताप यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी, वाचा सविस्तर

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा एस टी आगारासाठी तातडीने ३० नवीन बस द्या; माजी आमदार जयवंतराव जगताप यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी, वाचा सविस्तर

करमाळा(प्रतिनिधी); एसटी आगारासाठी तातडीने ३० नवीन बसेस उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. याविषयी अधिक माहिती देताना जगताप यांनी सांगीतले कि ,करमाळा एसटी आगाराकडे बसेसची संख्या कमी असून आहेत त्यादेखील नादुरूस्तीचे प्रमाण जास्त आहे . सुस्थितीतील एसटी बसेसची संख्या कमी असल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.

करमाळा आगाराला लांब व जवळच्या पल्ल्यासाठी एकूण ८५ बसेसची आवश्यकता असताना ६५ बसेस उपलब्ध आहेत त्यातील १० नादुरुस्त आहेत ,त्यामुळे गाड्या फेल होणे – रद्द होणे असे प्रकार वारंवार घडत आहेत.

त्यामुळे पासेस काढलेले शालेय विद्यार्थी , रुग्ण व प्रवाशांना प्रचंड गैरसाईला सामोरे जावे लागत आहे .शासनाने महिलांना व ज्येष्ठांना सवलतीच्या दरात प्रवास सुविधा दिल्या मुळे एसटी कडे प्रवाशांचा ओढा मोठ्या प्रमाणात वाढला आहे . परंतु बसेसची संख्या व त्यातही सुस्थितीतील बसेसची संख्या अपुरी आहे .

तरी यांवर ठोस उपाययोजना व अत्यावश्यक सेवेतील भाग असल्यामुळे शासनाने करमाळा बस आगारा साठी तातडीने ३० नवीन बसेस उपलब्ध कराव्यात अशी मागणी माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे .

हेही वाचा – जेऊर येथील ओढा खोलीकरण कामासाठी एक कोटी रुपयांच्या निधीची मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्याकडे माजी आमदार पाटील यांनी केली मागणी

कुऱ्हाडीने काकाचं मुंडकं तोडलं अन् बाईकवर घेऊन पुतण्या गावात फिरला, जमिनीच्या वादातून घडलेल्या घटनेने माढ्यात खळबळ!

“करमाळ्याचे दिवगत माजी आमदार नामदेवराव जगताप यांनी राज्य परिवहन महामंडळाचे सदस्य असताना करमाळा येथे भव्य बसस्थानक व वर्कशॉप ची उभारणी केली होती, तसेच शेकडो तरुणांना एसटी महामंडळात रोजागाराची संधी दिली होती. कै. जगताप यांची महामंडळ सदस्यपदाची कारकिर्द अविस्मरणीय होती. त्यामुळे माजी आमदार जगताप यांच्या मागणीला विशेष महत्व आहे .”

litsbros

Comment here