करमाळाक्राइमसोलापूर जिल्हा

करमाळा शहर व तालुक्यातील ४७ जणांना १२ लाखांचा गंडा; वाचा सविस्तर

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा शहर व तालुक्यातील ४७ जणांना १२ लाखांचा गंडा; वाचा सविस्तर

करमाळा(प्रतिनिधी);
चारधाम यात्रा घडवून आणतो म्हणून पुणे येथील एका ट्रॅव्हल्स कंपनीच्या करमाळा येथील 47 भाविकांना तब्बल 12 लाख रुपयाचा गंडा घालून आर्थिक फसवणूक केली आहे.याबाबत करमाळा पोलिसात तक्रार देण्यात आली असून याबाबत संबंधित संशयित आरोपीवर गुन्हा दाखल झालेला आहे.

याबाबतची हकीकत अशी की, करमाळा येथील काही भाविकांनी चारधाम यात्रा करण्याचे नियोजन केले होते.यामध्ये तब्बल 47 भाविकांनी एकमेकांना सांगून पुणे येथील ड्रीम कस्टर टूर्स ट्रॅव्हल्स हा व्यवसाय करणाऱ्या कंपनी ही फेसबुकच्या माध्यमातून शोधून सहलीचे नियोजन केले. यामध्ये ट्रॅव्हल कंपनीचे संचालक संकेत भंडाळे, ऋषिकेश भंडाळे, सुप्रिया भंडाळे सर्व राहणार धायरी जिल्हा पुणे व बालाजी सूर्यवंशी रा वडगाव बु तालुका हवेली जिल्हा पुणे याच्यांशी फेसबुकच्या माध्यमातून संपर्क केला.

या आयोजकांनी प्रत्येकी 25 हजार रुपये प्रवास खर्च सांगून पुणे ते चारधाम ठिकाणी यात्रा करण्याचे ठरवले होते. यामध्ये दहा दिवस व अकरा रात्री असा प्रवास करण्याचे व प्रवासातील सर्व खर्च हा ट्रॅव्हल व्यवसाय कंपनीने करण्याचे ठरले होते. यामध्ये पुणे ते दिल्ली असा विमानाने प्रवास करण्याचे ठरले होते.

यामध्ये हरिद्वार ,बारकोट, यमुनोत्री, उत्तरकाशी, गंगोत्री, केदारनाथ, बद्रीनाथ असा प्रवास ठरलेला होता. याबाबत 47 भाविकांनी विविध माध्यमातून 11 लाख 75 हजार रुपये या यात्रा कंपनीकडे भरले होते. वरील संशयित लोकांनी ड्रीम कास्टर टूर्स ट्रॅव्हल्स ने या सत्तेचाळीस लोकांना चार धाम यात्रा विविध कारणे देऊन रद्द केली होती. यामध्ये खराब हवामान तसेच वेगवेगळे कारणे देण्यात आली होती.

याबाबत या 47 भाविकांनी संबंधितांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी आता ही यात्रा रद्द करण्यात आल्याचे सांगितले तसेच पंधरा दिवसात तुमचे पैसे माघारी देतो असे सात मे 23 रोजी सांगितले होते. यासाठी या आयोजकांनी करमाळा वारीही केली होती.

सर्वांना चारधाम यात्रेबाबत विश्वासात घेतले होते. सर्वांचा विश्वास ही संपादन केला होता. मात्र त्यानंतरही त्यांनी पैसे तर परत दिलेही नाही व 4 मे ते 15 मे दरम्यान आयोजित चार धाम यात्रा ही घडवली नाही. करमाळ्यातील या 47 भाविकांची आर्थिक फसवणुक केली आहे.

हेही वाचा – करमाळयात आरोग्य मंत्री प्रा.तानाजीराव सावंत सांगतील तोच आमदार होणार; कुणी केला दावा? वाचा सविस्तर

सोलापूर जिल्ह्यात करणार १ लाख ११ हजार १११ रोपांचे वृक्षारोपण, IAS बालाजी मंजुळे यांच्या हस्ते पोंधवडी येथे झाला शुभारंभ; दादाश्री फाउंडेशनचा उपक्रम

संबंधित ट्रॅव्हल्स कंपनीच्या आयोजकांनी तुम्हाला काय करायचे ते करा आम्ही तुमचे पैसे माघारी देऊ शकत नाही असे सांगितल्याने या 47 भाविकांनी करमाळा पोलीस ठाण्यात जुन मध्ये च धाव घेतली होती.मात्र पोलिसांनी आषाढी वारीचे कारण देत तब्बल महिना उलटून गेला तरी याबाबत करमाळा पोलिसात अद्यापही गुन्हा दाखल केलेला नव्हता नंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला.

त्यामुळे भाविक मात्र फसवणूक झाल्याने “चारधाम यात्रा ही नाही व पैसेही नाही” अशी परिस्थिती झाली आहे. याबाबत फसवणूक झालेल्या भाविकांची संख्या आणखीन वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

litsbros

Comment here