ओ नेते, ग्रामपंचायत लढवली, आता महिन्यात खर्च सादर करा; शासनाचे आदेश, वाचा कुणाला किती होती मर्यादा?
केत्तूर ( अभय माने) करमाळा तालुक्यातील 16 ग्रामपंचायत निवडणुकीचा रणसंग्राम संपला आहे. निकालही जाहीर झाले आहेत परंतु, उमेदवारांना 30 दिवसात निवडणूक खर्च सादर करणे बंधनकारक आहे. त्यामुळे 6 डिसेंबर पर्यंत उमेदवारांना विहित नमुन्यात निवडणूक खर्च सादर करावा लागणार आहे.
सरपंच पदाच्या उमेदवारांना 50 हजार ते एक लाख रुपये पर्यंत तर सदस्य पदासाठीच्या उमेदवारांना 25 हजार ते 50 हजार रुपये पर्यंत निवडणूक खर्च करण्याची निवडणूक आयोगाने मुभा दिली होती. उमेदवार उमेदवारांनी अर्ज दाखल केल्या दिवसापासून निवडणूक खर्च गृहीत धरला जात आहे त्यामुळे विजयी आणि पराभूत उमेदवारांनी निवडणूक खर्च साधन सादर करावा लागणार आहे.
6 डिसेंबरपर्यंत निवडणुकीचा एकूण खर्च सादर करा न केल्यास त्या उमेदवाराचे पद रद्द केली जाते तसेच निवडणुकीत पराभूत उमेदवारांनी खर्च सादर करणे बंधनकारक आहे. खर्च सादर करण्याकडे दुर्लक्ष केल्यास आगामी निवडणुकीत अपात्र ठरविले जाते त्यामुळे 6 डिसेंबर पूर्वी उमेदवारांनी आपला निवडणूक खर्च सादर करावा लागणार आहे.
Comment here