करमाळाराजकारण

ग्रामपंचायत निकाल; ‘या’ 5 ग्रामपंचायतीवर आमदार संजयमामा शिंदे गटाची निर्विवाद सत्ता तर 3 ग्रामपंचायतीत युतीसह सरपंच

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

ग्रामपंचायत निकाल; ‘या’ 5 ग्रामपंचायतीवर आमदार संजयमामा शिंदे गटाची निर्विवाद सत्ता तर 3 ग्रामपंचायतीत युतीसह सरपंच

करमाळा (प्रतिनिधी); करमाळा तालुक्यातील नुकत्याच पार पडलेल्या 16 ग्रामपंचायती पैकी उंदरगाव ग्रामपंचायत बिनविरोध झालेली होती.

उर्वरित 15 ग्रामपंचायतीचे निकाल आज हाती आले असून या 15 ग्रामपंचायतीमध्ये आमदार संजयमामा शिंदे गटाने गौंडरे ,रामवाडी, घोटी, वीट व निंभोरे ग्रामपंचायत वर निर्विवाद सत्ता मिळवली असून गौंडरे ग्रामपंचायतचे सरपंच पदी आमदार संजयमामा शिंदे गटाचे सुभाष हानपुडे ,रामवाडी – गौरव झांजुर्णी, घोटी – विलासकाका राऊत, निंभोरे – रवींद्र वळेकर तर वीट ग्रामपंचायतच्या सरपंच पदी महेश गणगे यांची जनतेतून निवड झाली आहे.

          उर्वरित केतुर, कंदर व चिखलठाण या 3 ग्रामपंचायतीमध्ये बागल, पाटील युतीसह आमदार शिंदे गट सत्तेत सहभागी असून केतुर – 5 सदस्य ,चिखलठाण – 5 सदस्य व कंदर -3 सदस्य आ.शिदे गटाचे निवडून आले आहेत. 

या ग्रामपंचायती व्यतिरिक्त केम ग्रामपंचायत मध्ये मोहिते पाटील गटाला सरपंच पद मिळाले असले तरी विरोधी गटाचे 11 सदस्य निवडून आले आहेत यामध्ये शिंदे गटही सहभागी आहे. राजुरी ग्रामपंचायतचे सरपंच पद आमदार शिंदे गटाला मिळाले नसले तरीही त्या ग्रामपंचायत मध्ये 11 पैकी 6 सदस्य आमदार शिंदे गटाचे निवडून आलेले आहेत.

तसेच कावळवाडी, भगतवाडी या ग्रामपंचायतीमध्ये प्रत्येकी 2 सदस्य, रायगाव ग्रामपंचायत मध्ये 1 सदस्य शिंदे गटाचे निवडून आलेले आहेत. सर्व विजयी सरपंच व सदस्यांचे आमदार संजयमामा शिंदे यांनी अभिनंदन केले आहे.

litsbros

Comment here