करमाळाराजकारणसोलापूर जिल्हा

गावागावांतील सोसायट्या बाबत माजी आमदार जयवंतराव जगताप गटाने केला आहे ‘हा’ दावा; कोणत्या गावात कुणाची सत्ता वाचा क्लिक करून 

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

गावागावांतील सोसायट्या बाबत माजी आमदार जयवंतराव जगताप गटाने केला आहे ‘हा’ दावा; कोणत्या गावात कुणाची सत्ता वाचा क्लिक करून

करमाळा(प्रतिनिधी); करमाळा तालुक्यात विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या निवडणूका नुकत्याच पार पडल्या आहेत. यामधे बहुतांश गावच्या सोसायट्यांमधे जगताप गटाचा दबदबा कायम राहीला आहे. गतवर्षी झालेल्या वि .का . संस्थांच्या निवडणुकीत देखील जवळपास ७० टक्के गावच्या सोसायट्या जगताप गटाच्या ताब्यात आल्या आहेत.

नुकत्याच झालेल्या करंजे, शेलगाव (क ), कोळगाव, बाळेवाडी, सौंदे, दिवेगव्हाण, पांगरे, राजुरी, सांगवी, शेलगाव (वां ), वीट, कामोणे, पुनवर, वरकुटे, अर्जुननगर, जातेगाव या संस्था माजी आमदार जयवंतराव जगताप गटाकडे तर टाकळी, पोमलवाडी, बोरगाव, चिखलठाण, करमाळा , या संस्था आ. संजयमामा शिंदे समर्थकांकडे बिनविरोध आलेल्या आहेत.

या बिनविरोध पार पडलेल्या निवडणुका स्थानिक पातळीवर माजी आ .जगताप, माजी आ. नारायण पाटील, आ. शिंदे व बागल गटाच्या कार्यकर्त्यांनी सामंजस्याने पार पाडल्या आहेत . जिंती सोसायटीच्या झालेल्या निवडणुकीत माजी आ पाटील समर्थक राजेभोसले गटाने विजय मिळविला आहे.

पोफळज सोसायटी माजी आ. पाटील समर्थक व कल्याण पवार यांचेकडे आहे . तर सध्या निंभोरे, नेर्ले, हिंगणी, झरे व कंदर सोसायटीची निवडणूक प्रक्रिया सुरु आहे . सावडी संस्थेची प्रारूप यादी प्रसिद्ध झाली आहे .या सोसायटीच्या माध्यमातूनच सोलापूर जिल्हा मध्य .सह . बँक,कृषी उत्पन्न बाजार समिती, तालुका खरेदी – विक्री संघ या संस्था वरील सत्ता जगताप गटाने अबाधित ठेवल्या आहेत.

जगताप गटाने गेल्या ६० वर्षापासून सहकार क्षेत्रावर वर्चस्व ठेवले आहे . माजी आमदार देशभक्त नामदेवराव जगताप हे तब्बल ३५ वर्षे डिसीसी बँकेचे संचालक, काही काळ चेअरमन तर मार्केट कमिटीचे २५ वर्षे सभापती होते .

त्यांचेनंतर १९९० सालापासून माजी आमदार जयवंतराव जगताप बँकेचे संचालक व काही काळ व्हा.चेअरमन राहिले आहेत तर मार्केट कमिटीच्या इतिहासात सर्वाधिक काळ तब्बल २९ वर्षे सभापती पदी कामकाज पाहीले आहे.

बाजार समिती क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभवामुळे माजी आ. जगताप यांची महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघावर बिनविरोध संचालक पदी निवड झाली आहे .डीसीसी बॅक, बाजार समितीचे अधिकारी, कर्मचारी, सोसायट्यांचे गटसचिव, शेतकरी, व्यापारी यांचे जगताप गटाशी या माध्यमातूनअतूट असे नाते आहे.

गत बाजार समितीच्या निवडणुकीत बदललेल्या निवडणूक नियमांचा जगताप गटाला फटका बसला होता. परंतु पुनश्च निवडणूक प्रक्रियेत दुरुस्ती होवून सोसायटी व ग्रामपंचायत सदस्यांना मतदानाचा अधिकार मिळाल्यामुळे जगताप गट मजबूत स्थितीत आहे. सहकार क्षेत्रातील या वर्चस्वामुळे माजी आमदार जयवंतराव जगताप यांचा डीसीसी बँक व मार्केट कमिटी वरील मार्ग बिनदिक्कतपणे मोकळा झालेला आहे हे मात्र निश्चित .

litsbros

Comment here