करमाळा

पारेवाडी येथे भुयारी मार्गावर उसाने भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली उलटली

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

पारेवाडी येथे भुयारी मार्गावर उसाने भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली उलटली

केत्तूर (अभय माने) पारेवाडी (ता.करमाळा) रेल्वे भुयारी मार्गावर उसाची ट्रॉली पडल्याने वाहतूक ठप्प झाली यामध्ये कोणतीही जीवितहानी मात्र झाली नाही.

पावसाळ्यात वारंवार पाऊस होत असल्याने या भुयारी मार्गात पाणी साचून राहिल्याने वारंवार वाहतूक ठप्प होत होती तसेच ग्रामस्थांचे व शाळकरी विद्यार्थ्यांचे जाणे येणे बंद होत होतें यावर याबाबत “करमाळा माढा न्युज” ने वेळोवेळी आवाज उठवून सदर ठिकाणी वाचून राहणाऱ्या पाण्याचा रेल्वे प्रशासनाकडून बंदोबस्त करण्यात आला.

परंतु भुयारी मार्गावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहतुकीस पुन्हा एकदा अडथळा निर्माण होत आहे तसेच भुयारी मार्गशेजारी दरड कोसळण्याचा धोकाही आहे सोमवार (ता.20) रोजी या मार्गावरून ऊस वाहतूक करणारी ऊसाची ट्रॉली पडल्याने संपूर्ण रस्त्यावर ऊस झाला होता.

त्यामुळे इतर वाहतूक मात्र बंद पडली होती रेल्वे प्रशासनाने तात्पुरती डागडुजी न करता कायमस्वरूपी रस्त्याचा प्रश्न सोडवावा अशी मागणी परिसरातील ग्रामस्थ व वाहकांनी केली आहे.

छायाचित्र- पारेवाडी (ता.करमाळा)-भुयारी मार्गावर उसाने भरलेली पडलेली ट्रॉली

litsbros

Comment here