करमाळासोलापूर जिल्हा

पेन्शनसाठी आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नोकरीतून कमी करून बेरोजगार तरुणांना शासकीय सेवेत घ्या; करमाळा येथील नितीनभाऊ झिंजाडे यांची मागणी

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

पेन्शनसाठी आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नोकरीतून कमी करून बेरोजगार तरुणांना शासकीय सेवेत घ्या; करमाळा येथील नितीनभाऊ झिंजाडे यांची मागणी

करमाळा(प्रतिनिधी); पेन्शन किंवा वेतनवाढ यासाठी आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नोकरीतून कमी करून बेरोजगार तरुणांना शासकीय सेवेत घ्या अशी मागणी लोकसंघर्ष समितीचे अध्यक्ष नितीनभाऊ झिंजाडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

या निवेदनात पुढे म्हटले आहे की,राज्यातील तमाम बेरोजगारांच्या वतीने विनंती करण्यात येते की,सरकारी कर्मचाऱ्यांचा बेमुदत बंद म्हणजे कोट्यावधी जनतेला वेठीस धरण्याचा प्रकार आहे.आज सामान्य जनता या पेन्शनवाढीच्या विरोधात आहे.

सरकारने या आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामाप्रमाणे दाम निश्चितच द्यावे ऐकतच नसतील तर नविन नोकरभरती करावी व राज्यातील लाखो बेरोजगारांना न्याय द्यावा.बेरोजगार कमी पैशात नोकरी तर करतील शिवाय पेन्शनही मागणार नाहीत.सरकारी निधी मोठ्या प्रमाणात वाचेल.

हा निधी राज्याच्या विकास कामात गुंतवल्यास राज्य आणखी प्रगती साधेल.तरी आपण दोन्ही महोदयांनी पेन्शन किंवा वेतनवाढ यासाठी आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नोकरीतून कमी करून बेरोजगार तरुणांना शासकीय सेवेत घेण्याचा धाडसी निर्णय घ्यावा अशी विनंती केली आहे.

litsbros

Comment here