करमाळा शहरात हिंदू मुस्लिम एकतेचे दर्शन घडवा; एकादशी मुळे बकरी ईदच्या दिवशी कुर्बानी न करता दुसऱ्या दिवशी कुर्बानी करा, तांबोळी बंधूंचे मुस्लिम बांधवांना आवाहन
करमाळा (प्रतिनिधी अलीम शेख); दिनांक 29 जून 2023 गुरुवारी मुस्लिम समाजाचा महत्त्वाचा सण बकरी ईद तसेच हिंदू धर्मीयांचा एकादशी हे महत्त्वाचे दोन्ही सण एकाच दिवशी एकत्रित येत असल्याने मुस्लिम बांधवांनी बकरी ईदच्या दिवशी कुर्बानी न करता दुसऱ्या दिवशी कुर्बानी करून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश द्यावा व हिंदू मुस्लिम एकतीचे आगळे वेगळे दर्शन घडवावे असे आवाहन मुस्लिम समाजाचे तालुका अध्यक्ष तसेच ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे प्रांतिक अध्यक्ष हाजी उस्मान तांबोळी यांनी पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली.
यावेळी पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रवादीचे नगरसेवक हाजी अल्ताफ शेठ तांबोळी तसेच आतिक बेग खलील बागवान इदाज वस्ताद आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी अधिक माहिती देताना हाजी उस्मान शेठ तांबोळी पुढे बोलताना म्हणाले की करमाळा शहरात गेली कित्येक वर्षापासून हिंदू मुस्लिम एकोपा असून आजही करमाळा शहर व तालुक्यात विविध सण म्हटले की हिंदू मुस्लिम बांधव एक दिलाने एकमेकांच्या त्योहार मध्ये सामील होतात.
येत्या 29 जून रोजी बकरी ईद तसेच एकादशी महत्त्वाचे दोन्ही सण गेल्या वर्षापासून याही वर्षी एकत्र आल्याने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी मुस्लिम बांधवांनी मनाचे मोठेपण करीत हिंदू बांधवांच्या एकादशीच्या दिवशी कुर्बानी न करता ईदच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी कुर्बानी करावी असे आवाहन श्री तांबोळी यांनी बोलताना आपले मत व्यक्त केले.
पुढे बोलताना श्री तांबोळी म्हणाले की एकादशीच्या आठ दिवस अगोदर तसेच त्या दिवशी राज्यभरातील अनेक संतांच्या दिंड्या करमाळा शहरातून पंढरपूरकडे मार्गस्थ होत असतात.
यामुळे वारकरी संप्रदायाचा आदर ठेवण्यासाठी मुस्लिम बांधवांनी कुर्बानीच्या दिवशी कुर्बानी न करता दुसऱ्या दिवशी कुर्बानी करावी असे आव्हान शेवटी त्यांनी केले
Comment here