खडकेवाडी येथे खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या स्वराज साखर कारखान्याच्या साखरेचे वाटप
करमाळा(प्रतिनिधी):- माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या फलटण येथील स्वराज साखर कारखान्याच्या साखरेचे वाटप आज भाजपचे जिल्हा सरचिटणीस तथा डीपीडीसी सदस्य गणेश चिवटे यांच्या हस्ते खडकेवाडी, कुंभेज व झरे येथे झाले.
यावेळी बोलताना चिवटे म्हणाले की,खा.निंबाळकर यांनी गत वर्षी आपल्या तालुक्यातील ऊस गाळप केल्यामुळे आपल्या करमाळा तालुक्यातील लोकांची मोठी सोय झाली.
तसेच या कारखान्याने शेतकऱ्यांना रोख स्वरूपात पैसे दिल्याने शेतकऱ्यामध्ये या कारखान्याबाबत व खासदार यांच्याबाबत मोठा विश्वास निर्माण झाला आहे,आज सणासुदीच्या तोंडावर साखर वाटल्याने हा विश्वास द्विगुणित झाला आहे.
माढा लोकसभा मतदारसंघात चौफेर विकासासाठी खासदार काम करत आहेत.यामध्ये पाणी प्रश्न,रस्ते व कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवत आहेत.यावेळी महाराष्ट्र चॅम्पियन अफसर तात्या जाधव,
झरे ग्रामपंचायतचे सदस्य सोमनाथ घाडगे,किरण शिंदे, स्वराज कारखान्याचे सचिन शेंडगे,गजेंद्र पोकळे,प्रकाश ननवरे,अजय शिंदे,प्रज्वल जाधव आदी शेतकरी उपस्थित होते.
Comment here