करमाळाजेऊर

जागतिक महिला दिनानिमित्त जेऊर येथे पाच दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन; ज्योतीताई नारायण पाटील यांची माहिती; सहभागी होण्याचे आवाहन 

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

जागतिक महिला दिनानिमित्त जेऊर येथे पाच दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन; ज्योतीताई नारायण पाटील यांची माहिती; सहभागी होण्याचे आवाहन

करमाळा(प्रतिनिधी); जागतिक महिला दिन महोत्सव शनिवार पासून सुरू होत असून महिलांसाठी विविध स्पर्धात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आले असल्याची माहिती सौ. ज्योतीताई नारायण पाटील यांनी दिली. याबाबत अधिक माहिती देताना सौ पाटील यांनी सांगितले की गेल्या वीस वर्षांपासून जेऊर ता. करमाळा येथे जागतिक महिला दिन हा विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन साजरा केला जातो.

यामुळे ग्रामीण भागातील तसेच जेऊर शहरातील महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी एक चांगले व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा हा एक प्रयत्न असतो. यंदा दिंनाक 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन असुन या दिनाचे औचित्य साधून दि 4 मार्च ते 8 मार्च दरम्यान महिलांसाठी विविध कार्यक्रम घेतले जाणार आहेत.

यात शनिवारी दि 4 मार्च रोजी फनी गेम्स, उखाणे स्पर्धा व अनूभव कथन स्पर्धा होणार आहे तर रविवारी दि 5 मार्च रोजी रांगोळी, मेहंदी व हस्तकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. तर सोमवार दि 6 मार्च रोजी भारत महाविद्यालयाच्या वतीने महिलांची मोफत हिमोग्लोबीन तपासणी होणार आहे.

मंगळवारी दि 7 मार्च रोजी डान्स व पाककला या स्पर्धा होतील. दि 8 मार्च रोजी महिलांसाठी अंताक्षरी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा काही आॅनलाईन स्पर्धा घेण्यात येणार असून यात माझे किचन सुंदर किचन, माझे घर सुंदर गार्डन तसेच महिलांनी व्हाटस्अॅप स्टेटस, इन्सटाग्राम व इतर सोशल मिडिया साठी तयार केलेल्या रिल्स, स्टेटस व्हिडिओ आदिंची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी व्हिडीओ अथवा रिल्स दि 4 ते 7 मार्च दरम्यान स्विकारले जाणार असून यातुनच विजेत्यांची नावे काढली जातील. वरील सर्व स्पर्धांमध्ये प्रथम तीन क्रमांकाच्या विजेत्यांना दि 8 मार्च रोजीच्या बक्षिस वितरण सोहळ्यात आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात येणार आहे.

यंदा या स्पर्धेसाठी दोन गट तयार करण्यात आले असून पहिल्या गटात इयत्ता आठवी ते पदवी पर्यंतच्या मुलींचा समावेश आहे तर दुसरा गट हा फक्त महिलांसाठीच राखीव असणार आहे. या सर्व स्पर्धांमध्ये महिलांनी जास्तीत जास्तं संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन सौ जोतीताई पाटील यांनी केले.

यावेळी महिला दिन महोत्सव संयोजन समितीच्या सदस्या सौ अनिता जगताप, सौ रुक्मिणी कांडेकर, सौ जरिना मुल्ला, सौ मंगल गादिया, सौ रेणुका दोशी, सौ विजया भोसले, सौ जयश्री दळवी, सौ लता शिरस्कर, सौ यास्मीन शेख, सौ सुचीता राठोड, सौ प्रेमलता दोशी, सौ दोशी, सौ शालीनी नुस्ते, सौ धनश्री झांजुर्णे, सौ वैशाली कोठारी, सौ श्वेता गादिया, सौ अनिता लुणावत, सौ साधना लुणावत, सौ संगिता साळवे, सौ रत्नमाला बादल,श्रीमती विजया करणवर, आदिसह संयोजिका व परिक्षक उपस्थित होत्या. महिला दिनाच्या या स्पर्धा दिलेल्या तारखेनुसार आनंद पतसंस्था समागृह तसेच बाजारतळ सभागृह येथे वेळेत होणार आहेत.

आ. नारायण पाटील मित्रमंडळ व ग्रामपंचायत जेऊर यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम दरवर्षी आयोजित करण्यात येतो. यंदाचे वर्ष 21 वे वर्ष आहे.

litsbros

Comment here