वनविभाग मोहोळ टीमने केली मांगी परिसरात पाहणी, तो प्राणी म्हणजे बिबट्याच! वन अधिकारी म्हणतात नागरिकांनी सावध राहा; नागरिक म्हणतात ‘जाळे लावा, बिबट्या पकडा’
करमाळा (प्रतिनिधी); पोथरे परिसरात फिरणारा प्राणी म्हणजे तो बिबट्याच आहे ! असे वनविभागाच्या पाहणीत आज आढळून आले. वन विभागाची टीम आज मोहोळ येथून आज पोथरे येथे बिबट्याच्या पायाचे ठसे घेण्यासाठी आली होती.
त्यानंतर वन विभागाचे मोहोळ येथील अधिकारी कुरले यांनी अधिक माहिती देताना ते म्हणाले की पोथरे तसेच मांगी शिवारात फिरणारा बिबट्या च प्राणी असून नागरिकांनी रात्री शेताकडे जात असताना सावधानता बाळगावी. याशिवाय शेताकडे जात असताना एकटे जाऊ नये. शक्यतो रात्री अपरात्री घराच्या बाहेर पडू नये बिबट्या जेरबंद करण्यासाठी लवकरच आम्ही सज्ज असून त्या दृष्टीने आमची तयारी राहणार आहे असे वनाधिकारी म्हणाले
बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने जाळे लावावे
सध्या पोथरे तसेच मांगी शिवारात बिबट्याचा वावर असून वनपरीक्षेत्र अधिकाऱ्याने सदरचा बिबट्या लवकरच पकडावा अन्यथा भविष्यात जीवित हानी होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही असे मत पोथरे येथील पोलीस पाटील संदीप शिंदे यांनी करमाळा माढा न्यूज पोर्टलशी बोलताना आपले मत व्यक्त केले.
Comment here