ग्रामपंचायतीच्या निवडणुका.. होऊ द्या खर्च.! !
केत्तूर (अभय माने) करमाळा तालुक्यातील मुदत संपलेल्या 16 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा धुरळा उडाला असून उमेदवारी अर्ज मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. आज अर्ज माघारीच्या दिवशी 16 पैकी एक ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे. जिथे नि निवडणुका लागल्या आहेत तेथे आता सरपंचपदाचे उमेदवाराला 50 हजार ते 1 लाख 75 हजार रुपयांपर्यंत तर सदस्यपदासाठी 25 हजार ते 50 हजार रुपयेपर्यंत खर्च करण्याची मुभा निवडणूक आयोगाने दिली आहे, पण आता प्रत्यक्षात सरपंचपदाच्या निवडणुकीत खर्च मात्र लाखोंच्या घरात जात असल्याची चर्चा आहे.
निवडणुका जाहीर झाल्यानंतर भरण्यापासून खर्चाला सुरुवात होते. अर्ज भरताना काही रक्कम बँकेचे पासबुक हा खर्च पॅनेल प्रमुख उचलताना दिसत आहेत निवडणूक खर्चाचा महापूर येथूनच सुरु होतो.निवडणूक प्रचारासाठी किती रुपयापर्यंत खर्च करावा यावर निर्बंध आहेत.
निवडणूक आयोगाच्या बंधना व्यतिरिक्त अधिक खर्च झाल्यास संबंधित उमेदवारावर कारवाई करण्यात करण्यात येते त्यामुळे मतदान होईपर्यंत उमेदवाराच्या खर्चावर अप्रत्यक्ष नजर ठेवली जाते.
यापूर्वी 7 ते 17 सदस्य संख्या असणाऱ्या ग्रामपंचायत सदस्यासाठी 25 हजार रुपये खर्च मर्यादा करण्यात आली होती मात्र 21 ऑगस्ट 2017 पासून निवडणूक आयोगाने खर्चात वाढ केली आहे आता 7 ते 9 सदस्य संख्या असणाऱ्या उमेदवारांना 25 हजार रुपये, 11 ते 17 सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायतीसाठी 50 हजार रुपये लागणार आहेत.
गेल्या काही वर्षापासून सरपंच पदाची निवडणूक थेट जनतेतून होत असल्याने सर्व सरपंचपदाची निवडणूक लढण्याचा खर्च निवडणुक आयोगाने खर्चाची बंधन घातले आहे यापूर्वी थेट सरपंचपदाच्या निवडणूका झालेल्या आहेत.
सरपंच पदाच्या निवडणुकीचा खर्च देखील निवडणूक आयोगाने ठरवून दिला आहे.यावरही निवडणूक आयोगाची बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.सरपंच पदासाठी वारेमाप खर्च केला जात अशी चर्चा मात्र होत आहेत.
7 ते 9 सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीसाठी 50 हजार,11 ते 13 सदस्य असलेल्या ग्राम पंचायतीसाठी 1 लाख रुपये तर 13 ते15 सदस्य संख्या असलेल्या ठिकाणी 1 लाख 75 हजार रुपये खर्च करणे बंधनकारक आहे.
” जनतेतून सरपंच पदाची निवड होत असल्यामुळे ज्याची भावकी जास्त त्याचाच सरपंच असे अनेक ठिकाणी निदर्शनास आले आहे. त्यामुळे प्रशासनाची जान व गावातील विकास कामांसाठी हिरहिरीने सहभाग घेणार्या कर्तुत्वान तरुणांना जनतेतून सरपंच पद निवडीमुळे डावलले जात आहे. परिनामी या निर्णयामुळे अनेक ठीकाणी पँनल प्रमुखांना सदस्य पदासाठी उमेदवार उभे करताना दमछाक झाली आहे “
आज अर्ज माघारी नंतर उमेदवार फिक्स झाल्याने सगळीकडे वातावरण तापले आहे. तर आता हॉटेल ढाब्यानवर जेवणावळी जोरदारपणे सुरू झाल्या आहेत.
Comment here