करमाळाशैक्षणिकसोलापूर जिल्हा

करमाळा तालुक्यातील एक दोन नव्हे तर ‘या’ नऊ जणांची PSI पदी निवड; अभ्यास करणाऱ्या तरुणाईत उत्साह

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा तालुक्यातील एक दोन नव्हे तर ‘या’ नऊ जणांची PSI पदी निवड; अभ्यास करणाऱ्या तरुणाईत उत्साह

करमाळा(प्रतिनिधी); करमाळा तालुक्यातील जनतेला अभिमान वाटावी अशी ही बातमी आहे. नुकत्याच पीएसआय परीक्षेच्या जाहीर झालेल्या निकालात करमाळा तालुक्यातील तरुणाईने बाजी मारली आहे. या निकालात एक दोन नव्हे तर तालुक्यातील तब्बल नऊ जणांची पीएसआय म्हणून निवड झाली आहे. या निवडीमुळे करमाळा तालुक्यातील नवीन होतकरू अभ्यास करणाऱ्या मुला मुलींमध्ये एक उत्साह संचारला आहे त्यांना अभ्यास करण्यास आता बळ मिळत आहे.

पीएसआय पदी निवड झालेल्या उमेदवारांची नावे व गावे खालील प्रमाणे

१) गुडसळी गावची कन्या आणि त्या गावच्या इतिहासातील पहीली पोलीस उपनिरीक्षक विद्या किसन कळसे

२) शेटफळ गावचे सुपुत्र अमित गौतम लबडे तसेच

३)कोर्टी गावचे सुपुत्र दत्ता एकनाथ मिसा

४) सरपडोह गावचे सुपुत्र सागर जयवंत पवार

५) गौंडरे गावची कन्या सोनाली महादेव हनपुडे

६) चिखलठाण गावचे सुपुत्र निखिल ( सागर ) हिरामण सरडे

हेही वाचा – कोरोनात छत्र हरपलेल्या बालकांना जगदीशब्द फाऊंडेशनचा आधार; सलग तिसऱ्या वर्षी केले शैक्षणिक साहित्याचे वाटप

समाजाचा विश्वास असणारी समाजातील देवमाणसं म्हणजे गुरु; कुंभेज येथे प्रा.गणेश करे पाटील यांचे प्रतिपादन

७) सोगाव चे श्रीकांत लक्ष्मण गोडगे

८) वीट गावचे सुपुत्र अभिजीत दत्तात्रय ढेरे

९) ओंकार दत्तात्रय धेंडे रा जिंती

या ९ ही जणांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्या बद्दल त्यांचे विशेष अभिनंदन व खुप खुप शुभेच्छा!

litsbros

Comment here