करमाळासांस्कृतिकसोलापूर जिल्हा

जेऊर येथील भारत शैक्षणिक संकुल संस्थेच्या वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त डॉ. श्रीमंत कोकाटे यांच्या व्याख्यानाचे आयोजन

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

जेऊर येथील भारत शैक्षणिक संकुल संस्थेच्या वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त डॉ. श्रीमंत कोकाटे यांच्या व्याख्यानाचे आयोजन

करमाळा (प्रतिनिधी अलीम शेख); जेऊर येथील भारत शैक्षणिक संकुल संस्थेचे वार्षिक स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने येत्या मंगळवारी जेऊर येथे श्रीमंत कोकाटे यांचे व्याख्यान असून  इतिहास प्रेमींना भारत शिक्षण प्रसारक मंडळ यांच्याकडून  मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सचिव प्रा अर्जुन सरक यांनी केले आहे.

या एकूण कार्यक्रमाबद्दल माहिती देताना संस्था सचिव सरक यांनी सांगितले की जेऊर ता. करमाळा येथील भारत शिक्षण प्रसारक मंडळाच्या शैक्षणिक संकुलाचे वार्षिक स्नेहसंमेलन दिनांक ९ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता संपन्न होत आहे. या निमित्त प्रसिद्ध इतिहासकार आणि वक्ते श्रीमंत कोकाटे यांचे व्याख्यान भारत शैक्षणीक संकुलाच्या भव्य मैदानावर आयोजित केले आहे.सं

स्था अध्यक्ष तथा माजी आमदार नारायण (आबा) पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा संपूर्ण सोहळा पार पडणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रसिध्द उद्योगपती नारायण शेठ आमरुळे (झरे ) यांना आमंत्रित केले आहे. या कार्यक्रमात  दहावी, बारावी बोर्ड, विद्यापीठ आणि स्पर्धा परीक्षेत विशेष यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे तसेच तालुका, जिल्हा, विभागीय, राज्य, आणि राष्ट्रीय स्तरावर वेगवेगळ्या क्रीडा प्रकारात निवड झालेल्या विद्यार्थी खेळाडूंचे सत्कार मान्यवरांचे हस्ते बक्षीस वितरण सोहळ्यात होणार आहेत.

भारत शैक्षणिक संकुलाचे हे ६४ वे वार्षिक स्नेहसंमेलन असून मंगळवार ९ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता व्याख्यान तसेच गुणवंत विद्यार्थी पारितोषिक वितरण सोहळा होणार आहे. तर बुधवार १० जानेवारी रोजी दुपारी २ वाजता विविध गुण दर्शन कार्यक्रम होणार आहे. यंदा शिक्षक चिटणीस म्हणून पाटकुलकर सर यांचेवर जबादारी सोपवण्यात आली आहे.

भारत शिक्षण प्रसारक मंडळाच्या प्राथमिक, हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज तसेच भारत महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी हे या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी परिश्रम व योगदान देत असल्याचे सचिव प्रा अर्जुनराव सरक यांनी सांगितले.

हेही वाचा – कुस्तीमध्ये दिलेल्या योगदानाबद्दल माजी आमदार नारायण आबा पाटील यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान निमगाव केतकी येथील ग्रामस्थांनी दिला पुरस्कार

सोमनाथ ओहोळ लिहितात.. ‘जग बदलणारा बापमाणूस’ पुस्तक म्हणजे सर्वांना, सर्वांचे बाबासाहेब सांगणारे पुस्तक

यावेळी संस्था उपाध्यक्ष अनिलकुमार गादिया, महाविद्यालय प्राचार्य डॉ अनंतराव शिंगाडे,भारत हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज प्राचार्य केशव दहिभाते, उपप्राचार्य एन. डी कांबळे, पर्यवेक्षक बी एस शिंदे,भारत प्रायमरीचे मुख्याध्यापक दीपक व्यवहारे,शिक्षक  चिटणीस पाटकुलकर आदी उपस्थित होते.

litsbros

Comment here