करमाळा

डोक्यावर आग ओकणारा सूर्य; मुक्या प्राण्यांने शोधला स्वतःसाठी निवारा

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

डोक्यावर आग ओकणारा सूर्य; मुक्या प्राण्यांने शोधला स्वतःसाठी निवारा

केत्तूर(अभय माने): यावर्षी फेब्रुवारी महिन्यापासूनच उन्हाचा चटका बसत आहे तो जून महिन्यातही कायम आहे. तापमान चाळीशी पार झालेले असून उकाडा वाढत चालला आहे. त्याचा फटका नागरिकांसह पशुपक्षी व मुक्या प्राण्यांनाही बसत आहे. त्याचाच प्रत्यय आज एक भटक्या कुत्री व तिच्या पिल्लांकडे पाहिल्यानंतर आला. यावरून मुक्या प्राण्यांच्या जीवांची घालमेल सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे.

     सद्या वातावरणात सूर्यनारायण आग ओकत असून तापमान 40 च्या पुढे गेले होते.जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाऊस पडेल असे वाटत होते,परन्तु आज (ता.9) आली तरी पावसाच्या लवलेश नाही यावरून वातावरणातील उकाडा असह्यप्राय बनू लागला आहे.

या वाढत्या उन्हामुळे मुक्या प्राण्यांची होणारी घालमेल केतूर (ता.करमाळा) येथे दिसून आली.नवीन बांधकामासाठी लागणाऱ्या व वाळूला पर्याय म्हणून वापरल्या जाणाऱ्या कचचा (डस्ट) ढिगारा लिंबाच्या झाडाखाली टाकण्यात आला होता.

तेथेही उष्णता होती पटन्तु लिबाच्या झाडाची सावली व खाली ओलावा असल्याने या कुत्रीने या कचचा ढिगारा बऱ्याच वेळा पोखरून भुयार करून उन्हापासून बचाव करण्यासाठी स्वतःचे असे काही दिवस का असेना पण एक (बोगदा) घर तयार केले. 

या गाभण कुत्रीने स्वतःचे घर तर तयार करून उन्हापासून संरक्षण तर केलेच शिवाय या घरातच नुकताच पाच गोड्स व अतिशय निरागस पिलांना जन्म दिला.त्यामुळे या डस्टच्या घरात सध्या ही पाचही पिल्ले व त्यांची आई (कुत्री) सुखरूप असल्याचे पहावयास मिळत आहे.

litsbros

Comment here