करमाळाधार्मिकसोलापूर जिल्हा

करमाळा तालुक्यात  ईद-उल- अजहा अर्थात बकरी ईद उत्साहात साजरी; हाजी उस्मान शेठ तांबोळी यांच्या आवाहनाला मिळाला मोठा प्रतिसाद

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा तालुक्यात  ईद-उल- अजहा अर्थात बकरी ईद उत्साहात साजरी; हाजी उस्मान शेठ तांबोळी यांच्या आवाहनाला मिळाला मोठा प्रतिसाद

करमाळा: (तालुका प्रतिनिधी अलीम शेख); करमाळा तालुक्यात  ईद-उल- अजहा अर्थात  बकरी ईद उत्साहात साजरी करण्यात आली. करमाळा शहर काझी  मुजाहिद काझी व मौलाना मुश्ताक काझी यांच्या नेतृत्वाखाली करमाळ्यातील ईदगाह मैदानात सामुदायिक नमाज व कुराण पठण करण्यात आले. 
याच बरोबरच शहरातील सर्वच मशिदीतही व  तालुक्यामधील  ईद-उल-अजहा उत्साहात साजरी करण्यात आली. 

शहरातील ईदगाह मैदानावर हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधवांनी हजेरी लावली. नमाज पठण मौलाना मुश्ताक काझी यांनी केले तर कुराण  ( खुतबा ) पठण करमाळा शहर काझी मुजाहिद खलील काझी यांनी केले.

करमाळा शहर काझी यांनी हजरत इब्राहिम अलैहीसलाम आणि हजरत ईस्माईल अलैहीसलाम यांनी इस्लामसाठी दिलेल्या कुर्बानीचे महत्व पटवून दिले. प्रेम, निस्वार्थीपणा आणि त्यागाची शिकवण देणार्‍या ईद-उल- अजहा सणानिमित्त समाजात एकता आणि सौहार्द वृद्धिंगत व्हावे यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

शहरातील मक्का ( मरकज ) मशिदित मौलाना मोहसिन व मौलाना सिकदंर , नुरानी मशिदीत मौलाना  मरगबुल हसन ,जामा मस्जिदमध्ये मौलाना हाफिज अन्वर ,आयेशा मस्जिद मध्ये मौलाना मुफ्ती अबु रेहान कुरेशी, माॅ आयेशा मध्ये मौलाना हाफीज सय्यदअली मुजावर, तसेच मौलाली माळ येथील दर्गाह मशीदीत मौलाना हाफीज वजीर आदि मौलानानी नमाज पठण व कुराण पठण करून संपुर्ण विश्वात शांती व बंधुत्व वाढीस लावण्याची दुआ केली.

याचबरोबर करमाळा शहरासह आवाटी, कंदर , केम, उमरड,पारेवाडी, जिंती ,कोर्टी,सावडी, कुंभारगाव, जेऊर, रावगाव, सालसे, साडे , वांगी, कुगाव, विट, जातेगाव आदि ठिकाणी ईदगाह मैदानात सामुदायिक नमाज व कुराण पठण करण्यात आले. एकदंर तालुक्यात सर्वत्र ईद उत्साहात साजरी करण्यात आली.

हेही वाचा – केतूर ग्रामपंचायत निवडणूक आरक्षण जाहीर; क्लिक करून वाचा कोणत्या वॉर्डातून कोणाला संधी?

‘श्रीकमलादेवी पायथा ते खंडोबा मंदिर’ या रस्त्यावर दोन्ही बाजूंनी सर्विस रोड करा; मा.आ.जयवंतराव जगताप यांच्या बांधकाम खात्याला सूचना

आषाढी एकादशीच्या दिवशीच बकरी ईद आल्याने समाजातील सलोखा कायम रहावे यासाठी तीन दिवसा पर्यंत चालणा-या बकरी ईदची कुर्बानी हिंदु बाधंवाचा आदर करत दुस-या दिवशी करण्याचे आवाहन मुस्लिम समाजाचे अध्यक्ष हाजी उस्मानशेठ तांबोळी यांनी आवाहन केले होते.

याला शहर व तालुक्यात मोठा प्रतिसाद मिळाला. आज एकही कुर्बानी करण्यात आली नाही. मुस्लिम बाधंवाचेही हाजी उस्मानशेठ तांबोळी व नगरसेवक अलताफशेठ तांबोळी यांनी आभार मानले.

litsbros

Comment here