दहावी आणि बारावी परीक्षेच्या तारखा जाहीर; वाचा सविस्तर वेळापत्रक
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक दहावी आणि बारावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी २०२४ ते १९ मार्च २०२४ रोजी होणार आहे. तर दहावीची परीक्षा १ मार्च ते २६ मार्च २०२४ दरम्यान होनार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना लवकरच परीक्षेची तयारी सुरू करावी लागणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर , छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण विभागीय मंडळाकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत. दहावी आणि बारावीच्या परीक्षा प्रचलित पद्धतीनुसार आयोजित करण्यात येणार आहेत.
‘संकेतस्थळ, अन्य यंत्रणांवरील छापील वेळापत्रक किंवा व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून व्हायरल होणारे वेळापत्रक ग्राह्य धरू नये, अशा सूचनाही राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने करण्यात आल्या आहेत’.
Comment here