आज ढोकरी येथे अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य शेतकरी मेळावा, गुणवंतांचा सत्कार व प्रा.बंडगर यांचा सेवापूर्ती सोहळा
करमाळा(प्रतिनिधी); करमाळा तालुक्यातील ढोकरी येथे रविवारी 26 फेब्रुवारीला सकाळी 9 वाजता भव्य शेतकरी मेळावा व गुणवंतांचा सन्मान सोहळा तसेच बाजार समितीचे सभापती प्रा. शिवाजीराव बंडगर यांचा सेवापूर्ती सोहळा होणार आहे.
या मेळाव्याला अध्यक्ष म्हणून आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील उपस्थित राहणार असून प्रमुख पाहुणे आमदार विक्रम काळे, रामभाऊ निंबाळकर महाराज, मकाईचे चेअरमन दिग्विजय बागल, पंचायत समितीचे सभापती अतुल पाटील, जेष्ठ पत्रकार अॕड बाबुराव हिरडे उपस्थित राहणार आहेत. या शेतकरी मेळाव्यात रसायनशास्त्र मध्ये डॉक्टरेट झालेले डॉ अमोल पाटील हे कमी खर्चात 100 टन ऊस कसा काढायचा यावर मार्गदर्शन करणार आहेत.
तर आदिनाथचे माजी कार्यकारी संचालक हरिदास डांगे परिसंवाद चे अध्यक्ष राहणार आहेत तर सुवर्ण कृषी ऊस केंद्राचे संस्थापक नानासाहेब कदम उपस्थित राहणार आहेत. तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रा. शिवाजीराव बंडगर यांची शिक्षक प्रसारक मंडळ मध्ये झालेल्या 32 वर्षांच्या सेवेबद्दल त्यांचा सेवापूर्ती सोहळा होणार आहे. मेळावा ढोकरी येथील बंडगर वस्ती येथे होणार आहे.
तसेच या कार्यक्रमाला आदिनाथ, मकाई कारखान्याचे आजी-माजी चेअरमन, आजी-माजी संचालक, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे आजी-माजी सभापती, आजी-माजी सदस्य, बाजार समितीचे आजी-माजी संचालक व तालुक्यातील अन्य आजी-माजी पदाधिकारी उपस्थित राहणार असून वांगी परिसरातील गुणवान व कर्तत्वानांचा सन्मान सोहळा संपन्न होणार आहे. या कार्यक्रमास नागिकांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे अशी विनंती संयोजन समितीच्या वतीने आली आहे.
Comment here