करमाळासोलापूर जिल्हा

धनगर समाजाला एस.टी. प्रवर्गातून आरक्षण द्या; शंभूराजे जगताप यांची मागणी

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

धनगर समाजाला एस.टी. प्रवर्गातून आरक्षण द्या; शंभूराजे जगताप यांची मागणी

करमाळा(प्रतिनिधी); भारतीय राज्यघटनेने धनगर समाजाला दिलेल्या आरक्षणात त्रुटी असल्यास संसदेच्या विशेष अधिवेशनात त्या दूर करून तात्काळ आरक्षण लागू करावे व धनगर समाजाला न्याय द्यावा अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष शंभूराजे जयवंतराव जगताप यांनी केली आहे.

याबाबत अधिवेशनात मागणी मांडणेबाबत माजी आमदार जयवंतराव जगताप यांची खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासोबत चर्चा झाल्याचे जगताप यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील धनगर समाज आरक्षणापासून वंचित आहे. धनगर समाजाला घटनेतील आरक्षण मिळावे हि धनगर समाजाची मागणी आहे. गेल्या ७० ते ७५ वर्षापासून आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज लढत आहे.

धनगर समाजाच्या न्याय मागणीची दखल घेऊन तात्काळ धनगर एस.टी आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी अशी मागणी जगताप यांनी केली आहे.
तसेच धनगर समाजाला एस.टी आरक्षण मिळणेसाठी मौजे चोंडी येथे जे समाजबांधव आमरण उपोषणासाठी बसले आहेत.

हेही वाचा – डॉ.सानिया शेख या करमाळा नगर परिषद शाळेच्या विद्यार्थीनी ही अभिमानाची बाब – चंद्रकला तांगडे

ऊसबिलासाठी आश्वासने देऊन शेतकऱ्यांचा अंत पाहणाऱ्या मकाई अन बागलांच्या गलथान कारभाराविरोधात पुणे साखर आयुक्त कार्यालय येथे होणार बेमुदत हलगी नाद आंदोलन; वाचा सविस्तर

त्यांना पाठींबा देण्यासाठी करमाळा तालुक्यातील धनगर समाज बांधवांनी रविवार दिनांक १७/०९/२०२३ रोजी आयोजित केलेल्या करमाळा ते चोंडी या बाईक रॅलीस माझे पूर्ण समर्थन आहे अशी माहिती शंभूराजे जगताप यांनी दिली.

litsbros

Comment here