उद्योजक आण्णा पेटकर यांना जिवे मारण्याची धमकी
बार्शी येथील व्यावसायिक तथा व्यापारी आण्णा पेटकर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यांचे तुळजापूर रोडवर श्री महालक्ष्मी ज्वेलर्स या नावाने सोन्या-चांदीचे दुकान आहे तर शाळांना धान्य पुरवठा करण्याचा त्यांचा व्यावसाय आहे.
रविवारी ते नितीन भोसले, सतीश सपकाळ यांच्यासोबत एस.टी. स्टॅण्ड चौकामध्ये उभे असताना त्यांना फोनवरुन एक लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. मात्र, कोणीतरी आपली मस्करी करीत आहे म्हणून त्यांनी फोन कट केला. मात्र, त्याच दिवशी रात्री ७ च्या दरम्यान पुन्हा त्याच मोबाईल क्रमांकावरुन फोन आला १ लाख रुपयांची मागणी केली. पैसे दिले नाहीतर जिवंत ठेवणार नाही असेही म्हटले गेले. त्यामुळे आण्णा पेटकर यांनी बार्शी शहर ठाण्यात फिर्याद दिली असून कारवाईकडे लक्ष लागले आहे.
आण्णा पेटकर हे व्यावसायिक असून गेल्या महिन्यात त्यांनी आपल्या मुलीचा विवाह थाटामाटात केला होता. यावरुन त्यांना हा धमकीचा फोन आल्याचे समोर आले आहे. दोन नंबरचे धंदे करुन तु पैसे कमावले आहेस. त्यामुळे मलाही आता १ लाख रुपये दे अशी मागणी त्यांच्याकडे करण्यात आली होती. सुरवातीला कोणीतरी आपली मस्करी करीत आहे म्हणून आण्णा पेटकर यांनी त्या फोनकडे दुर्लक्ष केले. मात्र, पुन्हा सायंकाळी ७ च्या दरम्यान त्याच मोबाईल नंबरहून त्यांना फोन आला व तुला सांगितलेले कळत नाही का? जर पैसे नाही दिले तर जिवंत ठेवणार नाही अशी धमकीही देण्यात आली.
यावर तुला काय करायचे आहे ते कर, असे उत्तर पेटकर यांनी दिल्यानंतर तुला तुझी नाहीतरी नवीन जावयाची तरी काळजी असेल की असे म्हणून समोरच्या व्यक्तीने धमकी दिली.
विशाल रणदिवे यांनी हा फोन केला असल्याचे स्पष्ट झाले आहे. खंडणी मागून जीवे मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद आण्णा पेटकर यांनी दिली आहे.
Comment here