क्राइमबार्शी

धक्कादायक!… म्हणून सुनेने केला सासूचा गळा आवळून खून 

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

धक्कादायक!… म्हणून सुनेने केला सासूचा गळा आवळून खून 

बार्शी-सोलापूर रस्त्यावर बगले चाळ येथे राहणाऱ्या निर्मला महादेव धनवे (वय ५५) या महिलेचा शनिवारी (८ एप्रिल) सायंकाळी पावणेआठच्या दरम्यान राहत्या घरी मृत्यू नव्हे तर खुन झाल्याचे समोर आले आहे. हा खुन कोणी दुसरा तीसर्याने केला नसुन घरातील सुनेनेच सासुला डोक्यात काहीतरी मारून गळा आवळुन मारल्याचे शवविच्छेदन वैदयकिय अहवालात समोर आले आहे. याबाबत शहर पोलीसात सुने विरुद्ध ३०२ चा गुन्हा दाखल केला आहे .

कोमल अनिल धनवे वय 21 वर्ष, रा. सोलापूर रोड मनोहर बगले चाळ बार्शी या आरोपी सुने विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे .

अधिक माहिती अशी की, दि ८ एप्रिल रोजी सायंकाळी पावणेआठच्या दरम्यान राहत्या घरी निर्मला महादेव धनवे या महिलेचा मृतदेह समोर आला होता. याबाबत बार्शी शहर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद झाली होती . निर्मला धनवे यांचा मृतदेह शव विच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला होता. डॉ. रवींद्र माळी यांनी शवविच्छेदन केल्यानंतर मिळालेल्या वैदयकिय अहवालात त्या महीलेचा मृत्यु हा डोक्यास गंभीर जखम व गळा आवळुन झाल्याचे समोर आले आहे.

दरम्यान त्या दिवसां पासुन निर्मला धनवे या महिलेची हत्या की आत्महत्या ? याबाबत परिसरात जोरदार चर्चा सुरू होती. मृत्यू संशयास्पद असल्याची चर्चा तेथील नागरिकांमध्ये होती. अंत्यसंस्कार झाल्यानंतर पोलिसांनी संबंधित नातेवाइकांना पोलिस ठाण्यात बोलावून माहिती घेतली होती.

पोलीस तपासामध्ये यातील मयत निर्मला महादेव धनवे यांचे मागील आठ दिवसापासून पैसे व मिनीगंठन चोरल्याचे कारणावरून सासु निर्मला व सुन कोमल यांचेत वाद चालु होता. सुन कोमल हिने पैसे व मिनीगंठन चोरल्याचे सासु निर्मला हिस माहित झाल्याचे कारणावरून दि. ८ एप्रिल रोजी ५ .३० ते ६ .३० वाजण्याच्या दरम्यान

कोमल अनिल धनवे हिने घरामध्ये कोणी नसताना मयत सासु निर्मला हिचा गळा आवळून डोक्यात जखम करून मारून टाकले आणि केलेला खुन लपवण्यासाठी कुभांड रचत मयत निर्मला हि पडून जखमी होवून मुत्यु झाल्याचा बनाव केल्याचा अहवालानंतर निष्पन्न झाले आहे. यातील आरोपी सुन कोमल धनवे हिस अटक केली असुन याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर तोरडमल अधिक तपास करीत आहेत.

litsbros

Comment here