आम्ही साहित्यिकपुणेराज्य

बस ड्रायव्हर खरंच कौतुकाचा विषय …………..

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

🌹 बस ड्रायव्हर खरंच कौतुकाचा विषय 🌹
…………..
खरंच मानावं लागल एका धकाधकीच्या जीवनाला समाजसेवेचा वसा घेतलेल्या एका महान विधात्याला कारण खरंच विधाताच एका अर्थाने म्हणावं लागेल कारण हे जे क्षेत्र आहे ते साधारण 50 ते 70 लोकांना शेकडो किलोमीटरचा प्रवास करून सुखरूप घरी किंवा इच्छित स्थळी पोहोचवणं हा जणू वसा घेतलेला असतो तो एक चमत्कार म्हणजे बस ड्रायव्हर 
खरंच सर्वसाधारण स्तरातून होत असलेलं कौतुक पाहता त्यांच्या डोक्यावर टोपीच्या ऐवजी सोनेरी मुकुट ठेवावा असं वाटतं तरीही कौतुक अपूरच पडल कारण बस ड्रायव्हरची व्याख्या म्हणजे सर्व साधारण 70 प्रवासी असलेलं अवजड वाहनाचं सुखरूपपणे आणि यशस्वी सारथ्य करणं म्हणजे बस ड्रायव्हर खरंच बस ड्रायव्हर म्हणजे त्यामध्ये महामंडळाची एस टी, मुंबईची बेस्ट, पुण्याची पी एम टी, सर्वसाधारणपणे खाजगी तत्त्वावर चालणारी वोल्वो बस या सर्व ड्रायव्हरचा यामध्ये समावेश होतो कारण मी जास्तीत जास्त ह्या एस टी महामंडळाच्या अन पी एम टी बस ड्रायव्हरच्या जास्त करून सानिध्यात जाणार आहे मी स्वतः अनुभवलयं पुण्यामध्ये साधी सायकल चालवणं दिव्य समजलं जातं त्यामध्ये दुचाकी अजून अवघड आणि बस म्हणजे अक्षरशः अग्नी दिव्य पार केल्यावानी काही वेळेला अक्षरशः माणसांच्या गराड्यातून त्या समोरील असलेल्या दोन आरशामध्ये बघून सारा कसरतीचा खेळ खेळावा लागतो म्हणजे नेहमीचा वर्दळीचा भाग म्हणजे पुण्यामध्ये सुभान शाह दर्गा ते सोन्या मारुती चौक
सर्वसाधारण हा परिसर माझ्या पाहण्यातला आणि सर्वात गुंतागुंतीचा रस्ता या रस्त्यावरून सायकल चालवणारा सुद्धा हातात सायकल घेऊन चालतो एवढी जीवघेणी वर्दळ एक तर दिवसभर अन रात्री दहा वाजेपर्यंत रस्ता दिवसभर माणसाने ओसंडून वाहत असतो आणि त्यामध्ये गणपती व दिवाळीच्या सणासुदीच्या हंगामामध्ये प्रमाणापेक्षा जास्त खरेदी करण्यासाठी माणसांची तोबा गर्दी कारण इतर बाजार आणि दुकानापेक्षा निम्म्या किमतीत म्हणजे सुपर होलसेल दरामध्ये सामान मिळतं म्हणून महत्त्वाचं म्हणजे रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुचाकी लावलेल्या असतात थोडासा चार फुटाचा सुद्धा गॅप नसतो कारण दुकानदारांनी सुद्धा आपापल्या दारामध्ये तीन चार फुटाची लोखंडी जाळी दारात टाकलेली त्यामुळे दुचाकी पार्किंग एक डोकेदुखी आणि त्यामध्ये वेडी वाकडी वाहने लावल्यामुळे तशातच बस चालवणे म्हणजे महापराक्रम

दोन्ही बाजूच्या वाहनाला जराही स्पर्श न करता अथवा रस्त्यावरच्या माणसांना थोडी सुद्धा इजा न पोहोचवता ती अवजड बस चालवणं म्हणजे एक दिव्यचं खरचं कधी कधी वाटतं ड्रायव्हरचं मानावं तेवढं आभार करावं तेवढं कौतुक थोडंच आहे तीच परिस्थिती ग्रामीण भागातील एस टी ड्रायव्हरची एक तर आता आता रस्ते चांगले झालेत पण अजूनही एस टी चे ड्रायव्हर कंडक्टर आणि प्रवासी प्रवास केल्यावर पिठाच्या गिरणीतून बाहेर आल्यावाणी दिसतात असे रस्ते किंवा अवघड घाट एवढं सगळं मिळतं जुळतं घेऊन एखाद्याची वस्ती आणि पुढे असणारे स्टॅन्ड त्याला स्टॅंडवर सोडलं तर पुन्हा त्या बिचाऱ्याला एखादा फर्लांग किंवा किलोमीटर अलीकडं क्षणभर एस टी थांबवून त्यांनी उतरल्यावर मिळणारा तो वृद्धांचा आशीर्वाद कायम त्याच्या पाठीशी असतो काही ड्रायव्हरने खास या स्वभावामुळे काही हजारो नाती मायेची आणि प्रेमाची सांभाळलेली आहेत
आता बस ड्रायव्हरचं जीवन किती व्यस्त असतं ते आपण पाहू एखादी गोष्ट आपण अनेकदा केलेली असते अशीच कधीतरी करताना ती भावते त्यातून काहीतरी वेगळी अनुभूती होते आणि काहीसं एके दिवशी होतं एस टी तून इतका वेळा प्रवास केला तरी काही लक्षात राहिलेलं बऱ्याच दिवसांनी असं झालं एस टी मध्ये बसायला जागा नव्हती त्यामुळे नेहमीच्या आवडीची आणि आपली ठरलेली चालकाच्या मागच्या बरोबरची स्टॅंडिंग ची सीट काही लोकांना फारच आवडते कारण त्यामुळे तिथे उभा राहून त्या अजस्त्र यंत्राला न्याहाळण्यासारखं पूरक वातावरण असते चालकाच्या समोरच्या बाजूचा नीट अभ्यास केला तवा निरीक्षणाअंती असं लक्षात आलं की बस चालते यावर विश्वास बसत नाही धुळीचे थर त्या डॅशबोर्ड नावाच्या भागावर इतके साचलेले असतात ग्रिसची पुटं आजूबाजूला पडलेले दिसतात जणू काही तिथं कित्येक दिवसापासून पुसणे तर सोडाच पण साध्या कपड्याचा स्पर्श सुद्धा झालेला नाही असे दिसतं त्या उभ्या गजाच्या खिडकीतून ते समोरचे विलोभनीय दृश्य पाहायला मिळतं.

खुद्द आरपार जाऊ शकेल अशा मोठ्या आकाराच्या गॅप असलेल्या स्टेरिंगला दोन्ही हाताने पकडून तो बस हाकत असतो जीव काढून तो ते व्हील वळवत असतो तिथल्या पॅनलवर अनेक नॉब असतात हा झाला भूतकाळ कारण त्यातले तीनच जागेवर होते बाकीच्यांनी कवाच आपला मुक्काम आणि बस्तान हलवलेलं होतं त्यांनी काय व्हायचं आता ते कसं होतं आणि कसं होत असेल तर आणि होत नसेल तर ते कसं चालत असेल हे सार माझा तो ड्रायव्हरच जाणो दर दोन मिनिटांनी खाडकन असा आवाज व्हायचा तो गिअर टाकल्याचा आवाज असायचा गिअरचा दांडा साधारण तीन चार फुटी असतो आणि तो टाकायला विलक्षण ताकद आणि एक वेगळ्या प्रकारची अटकळ लागते ड्रायव्हरचं सीट म्हणजे इंजीनियरिंगचा एक उत्कृष्ट नमुनाच म्हणावा लागेल थंडगार वारा लागल्यामुळे बस नक्कीच भरधाव असणार हे नक्की असा समज करून स्पीडोमीटर कडे सहज नजर गेली तर तो विचारा बंद पडलेला एवढेच नाही तर त्याच्या आसपास असणाऱ्या सर्व डायल्स म्हणजे फ्युल मीटर किंवा एअर प्रेशर मीटर सगळं काही बंद त्यावेळी मनात प्रश्न निर्माण होतो की स्पीड, डिझेलची पातळी इंजिनाचं तापमान इत्यादी साऱ्या इतर गोष्टी त्या ड्रायव्हरला कळतात तरी कशा
आणि अशा अवस्थेतली बस चालवून जशीच्या तशी संध्याकाळी सुखरूप डेपोच्या हवाली करायची का नाही अशा माणसाचं कौतुक करावं एकदा तर बस चालू असताना ड्रायव्हर एका हाताने आपली पाठ चोळताना दिसला खूपच वाईट वाटलं त्या काटकोनी सीटला धड मऊपणा नव्हता आणि पाठीला कसला आधार नाही नुसती रेगझीन लावलेली फळी होती ही केवळ एखाद्या खाटेची रचना असते तशी रचना होती त्या बिचार्‍या चालकाने त्याच्या घरातील उशी आणून पाठीमागे ठेवलेली होती तेवढाच काय तो आराम असा गोड गैरसमज त्या बिचार्‍याच्या मनात एकंदरीत जितक्या कठीण परिस्थितीमध्ये ही मंडळी सर्व काम करतात त्यांना ती काम करताना नाही तर त्या व्यतिरिक्त सुद्धा त्रास असतो हे उघड आहे त्याबद्दल त्यांना वंदन करावं का त्यांचं कौतुक करावं हेच कळेनासं होतं.

हेही वाचा – कंदर येथे मयत झालेल्या कंत्राटी वीज कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला जेऊरच्या वीज वितरण कर्मचारी संघटनेने बीड जिल्ह्यातील घरी जाऊन दिला मदतीचा हात

वंदे भारत एक्सप्रेस चालु झाली त्याचा आनंद; परंतु सर्वसामान्यांसाठी काय? आम्हाला तिकीट सुद्धा परवडणार नाही..

इतक्या त्रासातून नेमाने प्रामाणिकपणे ते आपली जबाबदारी असल्यागत काम करतात
खरं बघायला गेलं तर त्यांच्या बस चालवण्याच्या कौशल्याबद्दल कोणीही बोलण्यास पात्र नाही इतकं मोठं धूड गर्दीतून रस्त्यावरून इतक्या अचूकपणे तरीपण वेळेवर या ठिकाणाहून त्या ठिकाणी नेणं हे करायला दैवी देणगी लागते ही झालं वीस वर्षांपूर्वीची गोष्ट आता महामंडळांनी कमालीची सुधारणा केली खरच अगदी घरच्यासारखं वातावरण केलंय एस टी महामंडळ म्हणजे महाराष्ट्रातील तमाम ग्रामीण भागातील जनतेच्या दृष्टीने एक अविभाज्य अंग नव्ह तर एक अवयव म्हणावा लागेल एस टी बस म्हणजे गावची शान एस टी जवा गावात येते पारावर तासभर थांबते आणि पुन्हा मार्गस्थ होईपर्यंत गाव जिवंत राहतो ते एक वेगळेच चैतन्य असते म्हणा महामंडळाने काही गाड्या म्हणजे एशियाड, शिवनेरी, मार्गावरील सर्व साधारण सर्व गाड्या त्यांनी जर प्रवास केला तर थोडक्यात सांगायचं म्हणजे त्यातील काही ए सी आणि रस्ते सुपर असतात त्यामुळे रोडनी चाललोय का विमानाने चाललोय असा प्रश्न पडतो
आणि अजून एक विशेष म्हणजे लांबचा प्रवास असेल तर दर दोन-तीन तासाने एखाद्या ढाब्यावर थांबून प्रवाशांच्या प्राथमिक गरजा, खाण्या पिण्यासाठी योग्य जागा उपलब्ध करून देणे हे फार मोठे मोलाचे कार्य सगळ्यात म्हणजे एस टी चा शंभर रुपयाचा प्रवास खाजगी ए सी गाड्या 80 रुपयात सेवा देतात त्यात सुरक्षिततेची कसलीही हमी नसते म्हणून घरचा माणूस सांभाळून नेतो आणि आणतो एस टी महामंडळाची आणि त्या
एस टी ची त्यामुळे सर्व ग्रामीण आणि शहरातील प्रवाशांचा ओढा अधिकृत महामंडळाच्या एस टी कडेच असतो ही काळ्या दगडावरची रेघ
*****************************************
किरण बेंद्रे
पुणे
ओढ असली तर…7218439002

litsbros

Comment here