करमाळाकेमसोलापूर जिल्हा

भाजप नेते धैर्यशिल मोहिते-पाटील यांनी केला करमाळा तालुक्यातील ‘या’ गावांचा दौरा; राजेभोसले यांच्यासह अनेकांची उपस्थिती

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

भाजप नेते धैर्यशिल मोहिते-पाटील यांनी केला करमाळा तालुक्यातील ‘या’ गावांचा दौरा; राजेभोसले यांच्यासह अनेकांची उपस्थिती

केम (प्रतिनिधी संजय जाधव);
भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी राबवलेल्या लोककल्याणकारी योजना व धोरणांची माहीती देत केंद्र सरकार समाजातील शेवटच्या घटकांचा विकास करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे ग्रामस्थांना सांगितले.

मतदारसंघातील जनतेच्या परिवारातीलच सदस्य असल्या प्रमाणे त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होत धैर्यशिल भैय्या मोहिते-पाटील यांनी सांत्वनपर भेटी घेतल्या.

तसेच या गावभेट दौऱ्यांच्या प्रसंगी धैर्यशिल मोहिते-पाटील यांनी ग्रामस्थांच्या समवेत संवाद साधला.त्यांच्या अडी-अडचणी प्रश्न जाणून घेतल्या व अगामी काळात देखील भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मतदारसंघातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी वचनबद्ध असल्याचे धैर्यशिल भैय्या मोहिते-पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा – भारताच्या चंद्रयान -३ मोहिमेत सोलापूर जिल्ह्यातील लेकीचाही सहभाग

बागल यांच्या गोठ्यातील वासरावर बिबट्याचा हल्ला; शेतकऱ्यांत दहशत, तात्काळ बंदोबस्त न केल्यास वन अधिकाऱ्यांना काळे फासू.. रासपचा इशारा!

याप्रसंगी जि.प.सदस्या सविताराजे भोसले, जिल्हा बँकेचे माजी संचालक भरतरीनाथ अभंग, अजित तळेकर, उदयसिंह मोरे-पाटील, संतोष पाटील, दीपक चव्हाण, अमरजित साळुंके, जगदीश अग्रवाल, नरेंद्र ठाकूर,आबासाहेब टापरे, शाम सिंधी, ज्ञानेश्र्वर खाटमोडे, शिवाजी जाधव आदींसह स्थानीक अनेक मान्यवर पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

litsbros

Comment here