करमाळाकेमराजकारणसोलापूर जिल्हा

भाजप खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत आमदार संजय मामा शिंदे यांनी काढले तिकीट; निवडणुकीच्या तिकिटांच काय?

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

भाजप खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत आमदार संजय मामा शिंदे यांनी काढले तिकीट; निवडणुकीच्या तिकिटांच काय?

करमाळा(प्रतिनिधी); मौजे – केम ता.करमाळा येथे आज ” कन्याकुमारी एक्सप्रेस” या रेल्वे गाडीला केम येथे थांबा मिळाल्याबद्दल करमाळा -माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून गाडी रवाना झाली.

यावेळी सदर गाडीचे केम ते पुणे पहिले तिकीट मामांनी काढले. या कार्यक्रमास माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार मा.रणजितसिंह नाईक – निंबाळकर अध्यक्षस्थानी होते. यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार संजय मामा शिंदे यांच्यातील वाढती जवळीक व पुढं निवडणुकीत ही तिकीट वाटप कसं होईल याविषयी उपस्थितांत चर्चा रंगली होती.

हेही वाचा – तुळजापूरला जाताना भाविकांच्या गाडीला अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू

अरे बापरे ! चमत्कार.!करमाळा एमआयडीसीतील डांबरीकरण केलेल्या रस्त्यावर उगवली झाडे

यावेळी सोलापूर जिल्हा भाजपचे जिल्हाध्यक्ष मा.चेतनसिंह केदार,रेल्वेचे ADRM मा.शैलेंद्र सिंग साहेब,लोहकरे साहेब, करमाळा तालुक्याचे भाजपचे तालुकाध्यक्ष मा.गणेश चिवटे, माढा तालुक्याचे भाजपचे तालुकाध्यक्ष मा.योगेश बोबडे, कुर्डूवाडी भाजपचे शहराध्यक्ष उमेश पाटील,

केम गावचे जेष्ठ नेते मा.दिलीपदादा तळेकर,मा.दादासाहेब पारखे,केम गावचे सरपंच मा.अजित तळेकर,मा.सागर दोंड,मा.बापू पारखे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

litsbros

Comment here