अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या रिक्त जागांची भरती सुरू; करमाळा तालुक्यातील
उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन
करमाळा (प्रतिनिधी);
महाराष्ट्र शासन अंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प करमाळा या कार्यालयाच्या वतीने अंगणवाडी सेविका, मिनी सेविका व मदतनीस पदाकरिता 2023 मध्ये भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून त्याचे उमेदवारी अर्ज दिनांक 10 मार्च 2023 पासून भरण्यास प्रारंभ झालेला असून उमेदवारांची अंतिम निवड यादी दिनांक 27 एप्रिल 2023 रोजी प्रकाशित होणार आहे तरी तालुक्यातील रिक्त असलेल्या ग्रामपंचायतीमधील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या पदांसाठी उमेदवारांनी अर्ज करावेत असे आवाहन आ. संजयमामा शिंदे यांनी केले आहे.
तालुक्यातील टाकळी, देवळाली, आळसुंदे ,वरकुटे, अर्जुननगर ,तरडगाव या गावांमध्ये सेविका पद रिक्त असून पारेवाडी, रामवाडी, साडे या गावांमध्ये मिनी अंगणवाडी सेविका पद रिक्त आहे.
त्याचप्रमाणे झरे, कुंभेज ,वांगी ,केडगाव ,केम, शेलगाव वांगी, कंदर, वडशिवणे, वाशिंबे ,उंदरगाव ,वीट,कोर्टी,विहाळ,पारेवाडी, केतुर ,सावडी, कुंभारगाव, कोंढार चिंचोली, खातगाव ,शेलगाव क,पोथरे, देवीचा माळ, वंजारवाडी, देवळाली ,पाथुर्डी ,आवाटी ,हिसरे, निमगाव ह,मिरगव्हाण, पांडे, बिटरगाव श्री , तरडगाव मलवडी या गावांमध्ये मदतनीस हे पद रिक्त आहे .
भरती प्रक्रियेचे वेळापत्रक प्रत्येक ग्रामपंचायतीला पाठवलेले असून सदर पदांकरिता अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 मार्च 2023 आहे.
उमेदवारांची प्राथमिक गुणवत्ता यादी प्रकाशित करण्याची तारीख 10 एप्रिल आहे, प्रकाशित झालेल्या यादीवर आक्षेप नोंदविण्याची तारीख 21 एप्रिल आहे व अंतिम यादी दिनांक 25 एप्रिल रोजी प्रकाशित होणार असून निवड यादी दिनांक 27 एप्रिल रोजी प्रकाशित होणार आहे.
Comment here