क्राइमपंढरपूरसोलापूर जिल्हा

भीषण अपघात; एसटी बसस्थानकात घुसली, 4 जण जखमी

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

 भीषण अपघात; एसटी बसस्थानकात घुसली, 4 जण जखमी

पंढरपूरमध्ये एसटी बसचा विचित्र अपघात झाला आहे. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं एसटी बस स्थानकातील फलाटामध्ये शिरली. या अपघातामध्ये बसच्या प्रतिक्षेत बस स्थानकात बसलेले चार प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांपैकी एक महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे. ही घटना आज सकाळी साडेसातच्या सुमारास घडली. या घटनेनं खळबळ उडाली आहे.

पंढरपूर आगाराची बस क्रमांक एम एच २० बी एल ४२१४ ही विना वाहक एटी बस पंढरपूर बस स्थानकातून सोलापूरला जाणार होती. मात्र याचदरम्यान चालक शब्बीर नासीर नदाफ यांचं बसवरील नियंत्रण सुटलं आणि बस एसटी स्थानकात घुसली. या अपघातामध्ये एसटीच्या प्रतिक्षेत बसलेले चार प्रवासी जखमी झाले आहेत. त्यातील एका महिलेची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे.

कमल विठ्ठल कुंभार ( वय ७२), पोपट जनार्धन गुटाळ (वय ६४), शालन पोपट गुटाळ ( वय ५५), सुप्रिया गणेश कुंभार ( वय ३०, रा. कुंभार गल्ली, भजन दास चौक, पंढरपूर) अशी या बस अपघातामध्ये जखमी झालेल्या प्रवाशांची नावं आहेत. यातील कमल विठ्ठल कुंभार यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातामध्ये त्यांच्या दोन्ही पायांना दुखापत झाली आहे. दरम्यान एसटीचा ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती चालकाकडून देण्यात आली आहे.

litsbros

Comment here