अठरा वर्षांनी एकत्रित येत माजी विद्यार्थ्यांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा
श्री खिलोबा विद्यालयातील सन 2004 – 2005 च्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न
माढा प्रतिनिधी – शाळा म्हटले की आठवते ते बालपण.शाळेत केलेल्या गमती जमती,खेळ,शिक्षकांनी दिलेला मार आणि त्यातच जर दहावीचे शेवटचे वर्ष असेल तर…दहावीचे वर्ष म्हणजे विद्यार्थांच्या आयुष्यातील टर्नींग पॉईंट.या नंतर विद्यार्थी आपापल्या मार्गाने जात असतो.पहिली ते दहावी शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना मनात नसताना सुद्धा एकमेकांपासून दहावीनंतर वेगळे होण्याची वेळ येते.
कोण सायन्स,कोण आर्ट,कोण वाणिज्य तर कोण डिप्लोमा डिग्री याकडे जातो.प्रत्येक जण आपापल्या कामात व्यस्त असतो.कारण प्रत्येक जण आपापल्या उद्योगाला लागलेला असतो.कोण कोठे आहे हे सुद्धा माहित नसते अशा परिस्थितीत भेट सोडा बोलणेही होत नाही.
अंजनगाव खेलोबा येथील श्री खिलोबा विद्यालयाच्या सन 2004-2005 या वर्षातील दहावीच्या विद्यार्थ्यांनी जवळजवळ अठरा वर्षांनी एकत्र येत आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.
श्री खिलोबा विद्यालयातील सन 2004 – 2005 या दहावीतील वर्षातील माजी विद्यार्थी एकत्र आले.यावेळी सर्वजण एकत्र आल्याचे पाहून प्रत्येक जण भावूक झाले होते.प्रत्येकाची विचारपूस केली गेली.
यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगत आतून जुन्या आठवणींना उजाळा दिला.
यावेळी विद्यार्थ्यांनी शाळेतील तसेच दहावी मध्ये घडलेल्या अनेक आठवणी सांगितल्या.मराठीचे आवडते शिक्षक भांगे सर,वरून फणसासारखे व आतून रसाळ असलेले भूमितीचे सलगर सर व गणिताचे उबाळे सर,याचप्रमाणे अभ्यासाबरोबर विद्यार्थ्यांमध्ये खेळाचे महत्व जाणणारे क्रीडाशिक्षक व इंग्रजीचे शिक्षक काळे सर, चित्रकलेच्या शिक्षिका गायकवाड मॅडम,हिंदी विषयाचे शिक्षक मोहोळे सर व चवरे मॅडम या शिक्षकांच्या आठवणी विद्यार्थ्यांनी आपापल्या मनोगत आतून व्यक्त केल्या या कार्यक्रमानंतर माजी विद्यार्थ्यांनी जेवणाचा आस्वाद घेतला.
हेही वाचा – करमाळ्यात तुरीला उच्चांकी दर; क्लिक करून वाचा प्रतिक्विंटल किती हजार.?
श्री नंदिकेश्वर विद्यालय उपळाई बुद्रूक मध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी
यावेळी किरण पाटोळे,लखन डोके, संतोष गडेकर,सुनील पाटेकर,गणेश रणपिसे,मदन जाधव,पंडित जाधव राजकुमार कोरके,पोपट माळी, सोमनाथ पाटेकर,महादेव नाईकनवरे, मुकेश रावडे,शंकर गडेकर,राहुल नागटिळक,बाळकृष्ण नागटिळक, बाळू देवकते तसेच
मुलीमध्ये प्रतिभा चौगुले,सुप्रिया चौगुले, अर्चना बंडगर,चिवु पाटेकर, सुनिता कुंभार,वैशाली पुजारी,माधुरी पाटील,संगीता गोरे,मीनाक्षी गोरे इत्यादी माजी विद्यार्थी उपस्थित होते.
या स्नेह मेळाव्यासाठी लखन डोके याने परिश्रम घेतले.या कार्यक्रमाची प्रस्तावना पंडित जाधव याने तर आभार प्रदर्शन किरण पाटोळे याने केले.
Comment here