करमाळासोलापूर जिल्हा

आ.संजयमामा शिंदे यांनी रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक यांची भेट घेऊन तालुक्यातील ‘या’ स्टेशनवरील कामांची केली मागणी

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

आ.संजयमामा शिंदे यांनी रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक यांची भेट घेऊन तालुक्यातील ‘या’ स्टेशनवरील कामांची केली मागणी

केत्तूर (अभय माने ) सोलापूर येथे आज करमाळा -माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजयमामा शिंदे यांनी रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक (D.R.M.) मा.निरजकुमार दोहरे यांची भेट घेतली.

यावेळी त्यांनी रेल्वेचे दुहेरीकरण विद्युतीकरण काम पूर्ण झाल्यानंतर जुने रेल्वे गेट बंद करून भुयारी मार्ग तयार केलेल्या रामवाडी,जिंती,भगतवाडी,गुलमोहरवाडी,पारेवाडी (ता.करमाळा) येथील रस्ते व दोन्ही बाजूला वॉल बसविणे तसेच जेऊर,पारेवाडी येथे रेल्वे गाड्यांना थांबा मिळणे व मौजे -दिवेगव्हाण, राजुरी येथील ३१७/१ मधील पाईपलाईन दुरुस्ती करणे इत्यादी कामांबाबत सविस्तर चर्चा केली.

हेही वाचा – करमाळा तालुक्यातील रस्ते विकास आराखड्यासाठी ग्रामपंचायतींनी रस्त्यांची नावे पाठवण्याचे आ.संजयमामा शिंदे यांचे आवाहन

निंभोरे सोसायटीवर माजी आमदार जगताप गटाचे वर्चस्व; क्लिक करून वाचा विजयी उमेदवार नावे..

वरीलपैकी दिवेगव्हाण,राजुरी येथील पाईपलाईन दुरुस्ती कामांबाबत संबंधित ठेकेदार यांना D.R.M. यांनी त्वरीत आदेश देऊन काम चालू केले यावेळी फिसरे गावचे युवा नेते भरतभाऊ आवताडे ,ताजोद्दिन हुंडेकरी (स्विय सहायक,D.R.M) मामांचे सोलापूर येथील स्विय सहायक संजय अंबोले साहेब उपस्थित होते.

छायाचित्र- सोलापूर :विभागीय रेल्वे व्यवस्थापक दोहरे मतदारसंघातील विविध मागण्यांचे निवेदन देताना आ.संजयमामा शिंदे

litsbros

Comment here