वह्यांच्या किमतीत घसरण: पालकांना दिलासा

वह्यांच्या किमतीत घसरण: पालकांना दिलासा

केत्तूर, (अभय माने) जून महिन्यापासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत असल्याने या पार्श्वभूमीवर शैक्षणिक साहित्याने बाजारपेठा सजू लागल्या आहेत. शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी विद्यार्थी तसेच पालकांची गडबड सुरू झाली आहे.

उन्हाळा सुट्टी संपल्यानंतर इंग्रजी माध्यमाच्या शाळा 10 जूनला तर मराठी माध्यमाच्या शाळा 15 जून पासून सुरू होत आहेत.

शाळा सुरू होणार म्हंटले की आधीच दुष्काळाने त्रस्त झालेल्या शेतकरी राजाला आता चिंता आहे ती मुलांच्या शिक्षणाची. त्यांना घर खर्चाची तरतूद करून पाल्याच्या शैक्षणिक खर्चही करावा लागत लागत आहे
मग त्यात शाळेच्या अवाढव्य असणाऱ्या फी व विद्यार्थी पालकांच्या शैक्षणिक साहित्यामध्ये वह्या, दप्तर, कंपास पेटी, पाण्याची बाटली,पुस्तकांचे कव्हर, सॅक याबरोबरच छत्री, रेनकोट आदी साहित्य खरेदी करण्यासाठी पैश्यांची जुळवा जुळव करण्यास सुरवात केली आहे.

हेही वाचा – “स्वच्छता मॉनिटरगिरी” करण्यात खातगाव नं.2 शाळा राज्यात सर्वोत्तम; मुंबईत होणार सत्कार, टॉप फिफ्टी मध्ये सोलापूर जिल्ह्यातील एकमेव शाळा

उमरड येथे राजमाता अहिल्याराणी होळकर यांना अभिवादन; दहावीतील गुणवंतांचा ही झाला सत्कार

दिलासादायक बाब म्हणजे यावर्षी वह्याच्या किमती वाढलेल्या नाहीत तर त्यामध्ये घसरूण झाली आहे. यामध्ये शंभर व दोनशे पाणी वह्यामागे पाच रुपये कमी झाले आहे तर कॉयरबुकच्या किमतीही पाच ते पंधरा रुपयांनी कमी झाल्या आहेत.

karmalamadhanews24: