उत्तरेश्वर ज्युनिअर कॉलेज केम येथे ‘एक ऋणानुबंधीय संवाद – माजी सैनिकाशी’ हा अनोखा उपक्रम संपन्न

उत्तरेश्वर ज्युनिअर कॉलेज केम येथे ‘एक ऋणानुबंधीय संवाद – माजी सैनिकाशी’ हा अनोखा उपक्रम संपन्न

केम (प्रतिनिधी संजय जाधव); श्री उत्तरेश्वर ज्युनियर कॉलेज केम या ठिकाणी इयत्ता बारावी मराठी पाठ्यपुस्तकातील वीरांना सलामी या पाठावर आधारित एक ऋणानुबंधीय संवाद माजी सैनिकाशी हा उपक्रम उत्साहात संपन्न झाला.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मेजर रघुनाथ तळेकर उपस्थित होते. यावेळी शालेय समिती अध्यक्ष श्री दयानंद तळेकर तर अध्यक्षस्थानी प्राचार्य श्री सुभाष कदम हे उपस्थित होते.

या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमात उत्तरेश्वर ज्युनियर कॉलेजच्या इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांनी मेजर रघुनाथ तळेकर यांना वेगवेगळे प्रश्न विचारून त्यांचे व्यक्तिमत्व जाणून घेतले. सैनिकाचे जीवन , त्यांची जीवन पद्धती, सीमेवर तैनात असताना आलेले अविस्मरणीय आणि कठीण अनुभव याबद्दल माहिती घेतली. मेजर तळेकर यांनी देखील विद्यार्थ्यांच्या सर्व प्रश्नांना समाधानकारक अशी उत्तरे देऊन त्यांचा उत्साह वाढविला.

यावेळी मेजर रघुनाथ तळेकर यांनी आपल्या मनोगतात त्यांना आसाम, मणिपूर तसेच गडचिरोली या ठिकाणी शत्रू सोबत आलेला थरार, तेथील त्यांचा जंगलातील आठ दिवसाचा उपाशीपोटी झालेला संघर्षमय प्रवास, त्यांनी शत्रू वर केलेली मात यांची रोमहर्षक माहिती दिली आणि विद्यार्थ्यांना सैन्य भरतीसाठी प्रयत्न करण्याचे आव्हान केले.

यावेळी श्री दयानंद तळेकर यांनी भारतीय सैनिकांचे महत्त्व सांगून या कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी राबवलेल्या या नवोपक्रमाचे कौतुक केले.

येथील विद्यार्थी आणि त्यांच्यातील देशभक्तीची भावना ही कौतुक करण्यासारखी असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी प्राचार्य श्री सुभाष कदम सर यांनी सैनिकांचे समाजात असलेले महत्त्वाचे स्थान आणि त्यांची देशाविषयी असणारी तळमळ विद्यार्थ्यांना सांगितली.

हेही वाचा – भारताच्या चंद्रयान -३ मोहिमेत सोलापूर जिल्ह्यातील लेकीचाही सहभाग

करमाळा उपजिल्हा रुग्णालयात अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

या कार्यक्रमास प्रा. डॉ. मच्छिंद्र नागरे, प्रा.संतोष साळुंखे , प्रा.संतोष रणदिवे, प्रा. सतीश बनसोडे , श्रीमती वृषाली पवार मावशी यांनी सहकार्य केले.

या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन श्री उत्तरेश्वर ज्युनिअर कॉलेज मधील विद्यार्थ्यांनी केले. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
karmalamadhanews24:
whatsapp
line