श्री उत्तरेश्वर हायस्कूलमधील विद्यार्थ्यांचे एस.एस.सी परीक्षेत उत्तुंग यश सेमी इंग्रजी माध्यमाचा शंभर टक्के निकाल

श्री उत्तरेश्वर हायस्कूलमधील विद्यार्थ्यांचे एस.एस.सी परीक्षेत उत्तुंग यश

सेमी इंग्रजी माध्यमाचा शंभर टक्के निकाल

माढा प्रतिनिधी –श्री उत्तरेश्वर हायस्कूल केम मधील विद्यार्थ्यांचे एस.एस.सी सन 2023-2024 परीक्षेत उत्तुंग यश मिळवले.सेमी इंग्रजी माध्यमाचा शंभर टक्के निकाल लागला आहे शाळेचा एकूण निकाल 97.81टक्के लागला आहे. प्रशालेतील एस.एस.सी सन 2023- 24 परीक्षेला 137 विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले त्यापैकी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण विद्यार्थी 48, प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण विद्यार्थी 60, द्वितीय श्रेणीसह उत्तीर्ण विद्यार्थी 26 आहेत.

प्रशालेतील प्रथम क्रमांक कु. गायत्री कृष्णा देवकर 94.20%,द्वितीय क्रमांक कु अपूर्वा अरुण तळेकर92%,तृतीय क्रमांक कु साम्राज्ञी नितीन तळेकर 88.40% प्रशालेतील यशस्वी गुणवंत विद्यार्थी आहेत.

हेही वाचा – पाणी पिण्यासाठी गेलेली गाय उजनीच्या गाळात फसली; मच्छीमारांच्या सतर्कतेमुळे सुटका!

सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर; करमाळ्यातील लीड स्कुलमध्ये शौर्या किशोर शिंदे प्रथम

प्रशालेचे माननीय मुख्याध्यापक कदम एस.बी ,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री वसंत तळेकर ,उपाध्यक्ष सौ पल्लवी रणशृंगारे,श्री गणेश तळेकर,शालेय व्यवस्थापन समिती मधील सर्व सदस्य,केम पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांनी प्रशालेतील एस.एस.सी परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
karmalamadhanews24:
whatsapp
line