उंदरगाव येथे आज क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्पाचा शुभारंभ

उंदरगाव येथे आज क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्पाचा शुभारंभ

माढा / प्रतिनिधी -(राजेंद्र गुंड)
-माढा तालुक्यातील पिंपळनेर येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना व उंदरगाव येथील गंगामाई क्षारपड जमीन संवर्धन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने उंदरगाव येथे आज बुधवार दिनांक 21 जून रोजी सायंकाळी 6 वाजता आमदार बबनराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे यांच्या हस्ते क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्पाचा शुभारंभ होणार असल्याची माहिती विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याचे ऊसपुरवठा अधिकारी नारायण लगड यांनी दिली आहे.

सीना नदी काठावरील अनेक शेतकऱ्यांनी पाण्याचा शेतीसाठी अविवेकी व अतिरेकी वापर केल्यामुळे अनेकांच्या जमिनी क्षारपड व नापीक बनल्या आहेत. यावर कायमस्वरूपी ठोस उपाययोजना करण्याच्या दृष्टीने व शेतकऱ्यांना योग्य पद्धतीने आणि काटकसरीने पाणी वापराचे नियोजन माहीत व्हावे या उद्देशाने विठ्ठलराव शिंदे सहकारी कारखान्याच्या माध्यमातून हा विधायक उपक्रम हाती घेतला आहे.

यावेळी प्रशासक कुंदन भोळे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सुहास पाटील,माढेश्वरी बँकेचे व्हा.चेअरमन अशोक लुणावत, विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे संचालक निळकंठ पाटील,अमोलनाना चव्हाण, संदीप पाटील,प्राचार्य सुभाष नागटिळक,मार्केट कमिटीचे संचालक हनुमंत पाडूळे,स्थापत्य अभियंता कीर्तीवर्धन मरजे,

हेही वाचा – राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बहुजनांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले – आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनानिमित्त अंजनगाव खेलोबा येथे वृक्षारोपण व खाऊ वाटप

श्री.मकाई सहकारी साखर कारखान्यावर पुनश्च बागल गटाची सत्ता; क्लिक करून वाचा, विजयी व पराभूत उमेदवारांची नावे व कोणाला किती मते मिळाली?

तालुका कृषी अधिकारी भारत कदम,केन मॅनेजर संभाजी थिटे,कृषी पर्यवेक्षक अनिल देशमुख,सरपंच संदीप पाटील,माजी सरपंच बाबा चव्हाण यांच्यासह मानेगाव परिसरातील विविध गावचे सरपंच,उपसरपंच,सोसायटीचे चेअरमन व शेतकरी उपस्थित राहणार असल्याचे संयोजकांनी सांगितले आहे.

फोटो ओळी- आमदार बबनराव शिंदे

karmalamadhanews24: